Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Cycle Scheme : मोफत सायकल वाटप योजना, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Free Cycle Scheme

Image Source : www.bangaloremirror.indiatimes.com

Free Cycle Scheme: पुरेशा सोयीसुविधांच्या अभावाने अनेक मुलीं शिक्षणापासून वंचित राहतात तसेच राज्यात गावोगावी अजूनही चांगले रस्ते नाहीत आणि वाहतुकीची हवी तेवढी साधने नाहीत या कारणांनी मुलींना घर ते शाळा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे राज्य सरकारने खेंड्यापाड्यावरील शाळकरी मुलींसाठी सायकल वाटप योजना राबवली आहे.

पुरेशा सोयीसुविधांच्या अभावाने अनेक मुलीं शिक्षणापासून वंचित राहतात तसेच राज्यात गावोगावी अजूनही चांगले रस्ते नाहीत आणि वाहतुकीची हवी तेवढी साधने नाहीत या कारणांनी मुलींना घर ते शाळा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे राज्य सरकारने खेंड्यापाड्यावरील शाळकरी मुलींसाठी सायकल वाटप योजना राबवली आहे. या योजने अंतर्गत सायकल देण्याचा निर्णय घेतला आहे ज्या मुलीचे घर आणि शाळा यातील आंतर किमान 5 किमी असेल अश्या मुलींनाच या योजनेत ग्राह्य धरण्यात येईल. 

महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रत्यक्ष सायकल वाटप केली जाईल. गावाकडील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली असल्यामुळे ते त्याच्या दैनंदिन कुटुंबाच्या गरजा सुध्दा भागवू शकत नाहीत तर आपल्या मुलीला शाळेच्या प्रवासासाठी सायकल कशी घेणार या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मुलींना सायकल अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

या योजनेचा उद्देश (Objective Of This Scheme)

  • मुख्य उद्देश शाळेत ये जा करताना कोणतीही अडचण येऊ नये
  • मुलींचा शैक्षणिक विकास व्हावा.
  • शाळेकरिता मैल भर चालण्यासाठी लागणार मुलींचा वेळ आणि श्रम वाचावे.
  • राज्यातील मुलींना मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी.
  • मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास.

अनुदानाचे टप्पे (Stages of grant)

  • पहिल्या टप्प्यात पात्र मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात 1/3 रक्कम 3500/- रुपये मिळतील
  • दुसर्‍या टप्प्यात त्यांना सायकल खरेदी करावी
  • सायकल खरेदी पावती दाखवल्यानंतर उर्वरित 1500 रुपये बँक खात्यावर जमा होतील
  • या योजनेत शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • डोंगराळ व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे.

आवश्यक पात्रता (Required Qualifications)

  • आठवी ते बारावीच्या वर्गात शिकत असणे गरजेचे या मुलींनाच प्राधान्य.
  • मुलीची शाळा राहत्या घरापासून 5 किमी किंवा त्याहून अधिक अंतरावर असावी.
  • सायकल वाटप करताना डोंगराळ आणि दुर्गम /गाव/वाड्या/तांडे/पाडे येथे राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य दिले जाईल.
  • महाराष्ट्राबाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे (Necessary documents)

  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फ़ोटो
  • बँक खात्याची झेरॉक्स प्रत
  • मोबाईल नंबर
  • ई - मेल आयडी असेल तर तो नमूद करा
  • विद्यार्थी इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
  • सायकल खरेदीची पावती

नोंदणी/अर्ज करण्याची प्रक्रिया (Registration/Application Process)

  • मुख्याध्यापकांकडून किंवा शाळेच्या संबधित कार्यालयातून या योजनेचा अर्ज घ्यावा.
  • माहिती आणि आवश्यक कागदपत्रे आवश्यक.
  • जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबधित विभागाला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज घ्यावा.

फायदे (benefits)

  • तब्बल 5000/- रुपयाची आर्थिक मदत
  • शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
  • वेळ आणि श्रम वाचतील
  • आर्थिक मदत डीबीटीच्या मदतीने लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात जमा केली जाईल.