दिल्ली सरकारने आता दिल्लीतील गरीबांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत (AAY) येणाऱ्या नागरिकांना मोफत साखर दिली जाणार आहे. वंचित कुटुंबांच्या अडचणी कमी करण्यासाठी आणि सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 2 लाख 80 हजार 290 लोकांना होणार आहे.
डिसेंबरपर्यंत मोफत साखर मिळणार आहे
यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीसाठी NFSA, अंतर्गत AAY घरगुती लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. आता दिल्लीतील AAY च्या लाभार्थ्यांना साखर अनुदान योजनेअंतर्गत दिल्ली सरकारकडून मोफत साखरही मिळणार आहे. AAY कार्डधारकांना साखरेचे वितरण डिसेंबर 2023 पर्यंत मोफत उपलब्ध करून दिले जाईल. या लाभार्थ्यांना दिल्ली सरकारकडून महिन्याला प्रति व्यक्ती 1 किलो साखर देण्यात येणार आहे.
2,80,290 लाभार्थ्यांना फायदा होणार
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत दिल्ली सरकारकडून मोफत साखर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अंदाजे 1.11 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तसेच या योजनेतून दिल्लीतील 68,747 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्डधारकांसह सुमारे 2,80,290 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.