Cotton Imports: कापसाच्या दरात घसरण दिसून येत आहे, त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे, त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia) तीन लाख गाठी म्हणजेच 51 हजार टन कापूस आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कापूस आयात होणार (Cotton will be imported from Australia)
2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून (Australia) कापूस आयात होणार आहे. केंद्र सरकारने कापूस धोरणाबाबत यंदा प्रचंड केलेली दिसून येत आहे. भारतातून कापूस आणि सुताची निर्यात बंद (Export of yarn stopped)आहे. आणि यातच आता परदेशातून कापूस आयात योग्य ठरेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कापूस उत्पादन कमी असून देखील योग्य भाव मिळत नाही. त्यातच मजुरीचे दर, डिझेलचे दर, औषधांत्यांचे किमती यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण पाहत आहोत. कापूस आयात करणे हे धोरण शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे.
कापसावरील 11 टक्के आयात शुल्क माफ? (11 percent import duty waived on cotton?)
कापूस आयातीवर (Cotton imports) असलेले 11 टक्के शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2022 च्या आयातीच्या तुलनेत या वर्षी आयातीत मोठी वाढ करण्यात आली आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Cotton Association of India) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल (Union Textiles Minister Piyush Goyal) यांची भेट घेतली होती. यावेळी कापूस आयातीसाठी कापसावरील 11 टक्के आयात शुल्क दूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत आयात शुल्क माफ करण्यात आलं आहे.
कापसाच्या दरात घसरण? (Fall in cotton prices?)
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र (Vidarbha, Marathwada, North Maharashtra) या सर्व भागात कापसाचे उत्पन्न घेतले जाते. सद्यस्थितीमध्ये कापसाचे दर घसरले आहे त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. हजार ते दोन हजार रुपयांनी कापूस घटला आहे. सध्या कापसाचा 7500 ते 7900 असा दर मिळत आहे.