Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance & Tax-Saving: 31 डिसेंबर ते 31 मार्च, फक्त 3 महिने बाकी! टॅक्स प्लॅन करा अन्यथा टॅक्स भरा

Insurance & Tax-Saving

Insurance & Tax-Saving: इंग्रजी वर्ष 31 संपले की लगेच 3 महिन्यांनी आर्थिक वर्षही संपणार. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी तुमच्या हातात फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे.

“31 डिसेंबर”च्या मध्यरात्री आयुष्याची झिंग आणणारा उत्सव संपला की आर्थिक वर्षाचे गणित घालणारा रणरणता “31 मार्च” खुणावू लागतो. नोकरदार (Salaried Person) असो व व्यावसायिक (business-person), करपात्र उत्पन्न असणे, केव्हाही कोणाला आनंद देणारे. पण उत्पन्नावर भरावा लागणार कर तितकाच जीवावर येणारा. मग धडपड सुरु होते ती टॅक्स वाचविण्याचे मार्ग शोधण्याची, असे मार्ग शोधून देणाऱ्या सनदी सेवापालांना (CAs) आणि आर्थिक सल्लागारांना (CFAs) भेटण्याची. पण तुम्हाला माहीत आहे काय की, इन्शुरन्स पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक ही देखील तुम्हाला “कर नियोजन” (अर्थात Tax-planning) करण्यासाठी उपयुक्त मार्ग आहे. अर्थातच कर वाचवण्यासाठी अनेक पद्धती आहेत, परंतु आज आपण “लाईफ इन्शुरन्स” या सर्वात प्रभावी कर नियोजन साधनाविषयी बोलणार आहोत.

प्रश्न असा आहे की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपला देय असलेला इनकम टॅक्स कसा वाचविते? भारतीय आयकर (प्राप्तिकर) कायदा (income tax act), 1961 च्या अंतर्गत, लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक करून आपण आपल्या कष्टांच्या पैशांवर भरावा लागणारा कर वाचवू शकतो. आता आपण याचा क्रमाक्रमाने विचार करू.

  • Entry Advantage अर्थात “गुंतवणुकीचा फायदा” - आपल्याला आयकर कायद्याच्या कलम 80C (जीवन विमा), 80CCC (पेन्शन) आणि कलम 80D (आरोग्य विमा) अंतर्गत आपण भरत असलेल्या प्रीमियम पेमेंटवर कर लाभ मिळतात.
  • Earning Advantage अर्थात “उत्पन्नाचा फायदा” - काही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज् “लाईफ कव्हर + इन्वेस्ट्मेन्ट्स” स्वरूपाची असतात. तेव्हा केलेल्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स आपण एक्सपेक्ट करू शकतो, जे पूर्णतः करमुक्त असतील.
  • Exit Advantage अर्थात “पूर्ततेचा फायदा” - आपल्याला प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10(10D) च्या अटींच्या अधीन राहून, पॉलिसी समाप्ती नंतर प्राप्त होणारे “मॅच्युरिटी बेनिफिटस्” एन्जॉय करता येतात, आणि ती देखील करमुक्त
  • Flexibility Advantage अर्थात “आपल्या फंडाच्या तरलतेचा फायदा” - आपली गुंतवणूक आपण इक्विटी, डेट फंड आणि बॅलन्स्ड फंडांमध्ये कधीही स्विच करू शकतो आणि हे स्विच कर-पात्र देखील नसतात.


आयकर कायदा, 1961च्या अंतर्गत कलम 80C च्या अंतर्गत,आपण आपल्या करपात्र उत्पन्नातून (taxable income) स्वत:साठी, पती/पत्नीसाठी किंवा मुलांसाठी लाईफ इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रीमियमच्या खात्यावर वजावटीचा दावा (claim for deduction) करू शकतो. या वजावटीची जास्तीत जास्त मर्यादा 1.5 लाख इतकी आहे. तर कलम 10(10D) च्या अनुसार, लाइफ इन्शुरन्स पॉलिसींमधून मिळालेला परतावा (अर्थात Returns) करमुक्त असतो.

याच कायद्याच्या कलम 80CCC अनुसार, आपल्याला पेन्शन पॉलिसींसाठी भरलेल्या प्रीमियमवर देखील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेवर टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. एवढेच नव्हे तर, कलम 10(10A), रिटायर्मेंटच्या वेळी “पेन्शन प्लॅन” अंतर्गत मिळणाऱ्या पेमेंटचा 1/3 भाग देखील करमुक्त असतो.

आता हे झाले “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी”बाबत. याव्यतिरिक्त आपण जेव्हा आपल्या स्वत:साठी, किंवा आपला जोडीदार, तसेच आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या मुलांकरिता घेतलेल्या “आरोग्य विमा” म्हणजे “हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज्”वर  भरलेल्या प्रीमियमवर कलम 80D च्या अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकतो. यामध्ये प्रिमिअमच्या रकमेची मर्यादा 25 हजार रुपये इतकी आहे. मात्र आपल्या आई-वडीलांसाठी घेतलेल्या “हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी”साठीच्या प्रीमियमची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत असेल.

टॅक्स बेनिफिट्स मिळविण्यासाठी आपण आपला फंड एंडोमेंट प्लॅन्स, ऍन्युइटी प्लॅन्स किंवा ULIP म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन सारख्या योजनांमध्ये गुंतवू शकतो. आपत्कालीन स्थितीसाठी (financial emergency) आणि भविष्यातील गरजांसाठी एक समाधानकारक फंड तयार करताना आपण आपले कर कायदेशीररीत्या कमी करण्याचे हे सर्व उत्तम मार्ग आहेत. मात्र टॅक्स वाचविताना ज्या योजनांमध्ये आपण आपला फंड गुंतवतो आहोत, त्या आर्थिक साधनांची तरलता (liquidity), सुरक्षितता (safety), परतावा (Returns), लवचिकता (flexibility) यांचा देखील विचार करणे आवश्यक आहे.