Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deccan odyssey Luxury Train पर्यटकांच्या सेवेत दाखल, या अलिशान ट्रेनचे तिकीट दर तुम्हाला माहिती आहेत का?

Deccan odyssey Luxury Train  पर्यटकांच्या सेवेत दाखल,  या अलिशान ट्रेनचे तिकीट दर तुम्हाला माहिती आहेत का?

Image Source : www.orientrailjourneys.com

या अलिशान ट्रेनमध्ये एकूण 21 डबे असून यामध्ये पर्यटकांसाठी एकूण 40 डिलक्स सूट आणि 2 प्रेसिडेंशिअल सूट आहेत. ट्रेनचे अंतरंग नेत्रदिपक आहे. या सोबतच ट्रेनमध्येच एक अलिशान असा कॉन्फरन्स हॉल देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय ट्रेनमध्ये पर्यटकांना स्पा, जिम,ग्रंथालयाची सुविधा देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी टीव्ही, इंटरनेट, म्युझिक साऊंड सिस्टिम अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी महाराष्ट्र राज्य हे पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडूनही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्याच प्रमाणे आता आंतराष्ट्रीय पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणाऱ्या डेक्कन ओडीसी (Deccan odyssey) या आलिशान ट्रेनची सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. राजेशाही थाटात प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर आज आपण जाणून घेऊयात..

डेक्कन ओडीसीची सेवा पूर्ववत

डेक्कन ओडीसी ही ट्रेन एक राजेशाही प्रवासाचा अनुभव देणारी सुप्रसिद्ध ट्रेन आहे. एमटीडीसी(MTDC) आणि केंद्रीय रेल्वे विभागाच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणाऱ्या या ट्रेनची सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता पर्यटनक्षेत्र सर्वासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने केंद्र सरकारच्या परवानगीने डेक्कने ओडिसीची (Deccan odyssey) सेवा 21 सप्टेंबरपासून  पुन्हा एकदा पू्र्ववत केली आहे. या ट्रेनचे आता नूतनीकरण करण्यात आले असून यामध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  तसेच डेक्कन ओडिसी या ट्रेनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सहलींसाठी राज्यासह देशभरातील विविध पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

का आहे खास?

2004 मध्ये या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  सोयी सुविधा देणाऱ्या ट्रेनची सुरुवात करण्यात आली. डेक्कन ओडिसी ही एक Ultra Luxury Train म्हणून देशभरात ओळखली जाते. राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या ट्रेनच्या माध्यमातून 5 स्टार हॉटेलच्या सुविधेचा अनुभव घेत राज्यातील पर्यटन स्थळांना भेटी देता येतात.  या अलिशान ट्रेनमध्ये एकूण 21 डबे असून यामध्ये पर्यटकांसाठी एकूण 40 डिलक्स सूट आणि 2 प्रेसिडेंशिअल सूट आहेत. ट्रेनचे अंतरंग नेत्रदिपक आहे. या सोबतच ट्रेनमध्येच एक अलिशान असा कॉन्फरन्स हॉल देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय ट्रेनमध्ये पर्यटकांना स्पा, जिम,ग्रंथालयाची सुविधा देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी टीव्ही, इंटरनेट, म्युझिक साऊंड सिस्टिम अशा सोयीसुविधा  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

किती आहे तिकीट?

डेक्कन ओडिसीने प्रवास म्हणजे अलिशान प्रवासाचा आयुष्यभराचा अनुभव आहे. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणारे तिकीटही तसेच महागडे आहे. या अलिशान ट्रेनने वर्ष 2023-24 साठी 8 विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. 7 रात्र, 8 दिवसांची ही सहल असेल. त्यामध्ये महाराष्ट्र स्प्लेंडर, इंडियन सोजन ,महाराष्ट्र वाईल्ड ट्रेन, दार्जिलिंग मेल या 4 सहलींचा प्रवास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय पर्यटकांना कमीत कमी 5,12,400 अधिक टॅक्स इतके तिकीट दर आकारले जाते. एकूण तिकीट दरामध्ये डीलक्स रुमसाठी एका व्यक्तीला 5,12,400 रुपये तर डबल बेड केबिनसाठी  7,35,000 रुपये तसेच मुलांसाठी अतिरिक्त रुमसाठी 5,51,460 रुपये आकारले जातात. तसेच प्रेसिडेंशिअल सूटसाठी एका रुमला 11,09,850 रुपये दर आकारला जातो. या तिकीटावर सरकारी नियमानुसार सर्विस चार्ज अतिरिक्त आकारण्यात येतो. तसेच याचे तिकीट बूक केल्यानंतर ते रद्द करण्यासाठी तुम्हाला चार्जेस लागू आहेत.

काय काय सुविधा मिळतात?

या तिकीट दरामध्ये डेक्कन ओडीसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डबल बेड केबिनमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध होते. तसेच ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान जेवण नाश्ता आणि शीतपेय देण्यात येते. तसेच पर्यटनस्थळावर प्रवेश शुल्क आणि कॅमेरा शुल्काचा यामध्येच समावेश आहे.