Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Date Farming: खजूर शेती आता भारतात, शेतकरी कमावतायेत एका झाडापासून 50,000 रुपये!

Date Farming

Image Source : www.agrifarming.in

खजूर हे कोरड्या हवामानात आणि पठारी वालुकामय प्रदेशात लागवडीसाठी अधिक योग्य आहे. भारतात म्हणावी तितकी खजुराची शेती केली जात नाही, परंतु अचूक नियोजन आणि कौशल्याचा वापर केला तर चांगले उत्पादन निघू शकते. राजस्थानात खजूर शेतीचा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरलाय.

केंद्रातील मोदी सरकार देशात उत्पादित होणाऱ्या भरडधान्याच्या (Millet Production) उत्पादनाला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भरडधान्याच्या उत्पादनासाठी आणि बाजारपेठेसाठी खास तरतूद केली गेली आहे.पौष्टिक भरडधान्यांचा जागतिक वापर वाढवण्यासाठी देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांनाही आकर्षित केले जात आहे. दरम्यान, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे भरड धान्यासोबत खजुराच्या लागवडीतून लाखोंचे उत्पन्न मिळू शकते. एका मीडिया रिपोर्टनुसार, एका खजुराच्या झाडापासून वर्षाला किमान 50,000 रुपये मिळतात. खजूर हे कोरड्या हवामानात आणि पठारी वालुकामय प्रदेशात लागवडीसाठी अधिक योग्य आहे.

भारत 38 टक्के खजूर आयात करतो

एका अहवालानुसार, अरब देशांमध्ये खजुराची लागवड अधिक केली जाते, कारण तेथील कोरडे हवामान खजूर उत्पादनासाठी सुलभ आहे. जागतिक बाजारपेठेत भारत दरवर्षी 38 टक्के खजूर विदेशातून आयात करतो. याचे कारण आपल्या देशात खजुराचे फारसे उत्पादन होत नाही. गुजरातमधील कच्छ, भुज भागात खजूराच्या काही स्थानिक जातींचे उत्पादन होत असले तरी त्यांची गुणवत्ता परदेशातून आयात केलेल्या खजुरांच्या तुलनेत फारशी ठीक नाही. अहवालानुसार, आता हळूहळू खजुराची लागवडआपल्या  देशातील अनेक भागांमध्ये नवनवीन प्रयोगांद्वारे केली जात आहे.

पौष्टिक खाद्य म्हणून खजूराला पसंती

खजूर हे असे फळ आहे, ज्यामध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण जास्त असते. एका अहवालानुसार, 1 किलो खजूरामध्ये सुमारे 3000 कॅलरीज असतात. याशिवाय व्हिटॅमिन ए, बी-2, बी-7, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर आणि लोह इत्यादींचा उत्कृष्ट स्रोत म्हणून खजूर ओळखले जाते. हे फळ उच्च उत्पादकतेसाठी देखील घेतले जाते आणि वाळवंटी भागात त्याची लागवड केल्याने पर्यावरणास देखील त्याचा फायदा होत असतो. यासोबतच खजुराच्या शेतीचा रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

खजुराच्या लागवडीतून वार्षिक 50,000 पर्यंत कमाई

राजस्थानमधील जैसलमेर येथील शास्त्री नगर येथील रहिवासी रामसिंग बिश्नोई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, खजुराच्या झाडापासून वर्षाला सुमारे 50,000 रुपये ते कमावतात. राजस्थानमध्ये क्षारयुक्त पाणी जास्त असून पाण्याची पातळी खूपच खालावली आहे, ही चिंतेची बाब जरूर आहे. असे असूनही 2000 टीडीएस असलेल्या पाण्यातून उगवलेला खजूर चवीला खूप गोड लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी 16 एकरात खजुराची झाडे लावल्याचे सांगितले आहे. त्यांनी या भागातील वालुकामय जमीनीवर 11 हजार खजूरांची लागवड करून खजुराची शेती विकसित केली ल आहे. 1 एकरात 70 खजुराची झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते मैदजूल, खलास, बार्ही आणि खोनेजी या जातीच्या खजूरांची लागवड करत आहेत.

महाराष्ट्रातील नागपुरात देखील खजुराची शेती करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. प्रायोगिक तत्वावर जरी ही शेती सुरु असली तरी अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आहे. 

खजुराची शेती कशी केली जाते?

साधारणपणे खजुराची लागवड फक्त बियापासून करता येते, परंतु त्याची रोपे कलमापासूनही वाढवता येतात. जेव्हा बियाण्यापासून खजूर उत्पादन घेतले जाते तेव्हा मादी वनस्पती (Female Plant) मिळण्याची शक्यता फक्त 50 टक्के असते, तर जेव्हा कलम केलेल्या रोपाद्वारे खजूर लागवड केली जाते तेव्हा त्या झाडातून अधिक उत्पन्न मिळवण्याची शक्यता असते. तथापि, आपल्या देशात खजुरासारख्या वेगळ्या वातावरणात आणि हवामानात वाढणाऱ्या वनस्पती जगण्याची शक्यता कमी आहे. खजूर वनस्पतींमध्ये बारही, खुनेजी, हिलवी, जाम,खडरवी इ. प्रकार आढळतात.

एका एकरात किती झाडे लावता येतात?

बियाणे पेरल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे लागते.खजुराच्या रोपांना हिवाळ्यात, महिन्यातून एकदा पाणी देणे पुरेसे आहे. ही झाडे इतर सामान्य शेतीप्रमाणे वाढवावी लागतात. तसेच, सुमारे 4 ते 5 वर्षांनी तुमचे उत्पन्न सुरू होते आणि तेव्हापासून तुमची कमाई सुरू होते. एका रोपातून पाच वर्षांनी सरासरी 70 ते 100 किलो खजूर मिळतात. यामध्ये एका एकरात 70 रोपे लावली असून 5 हजार किलोपेक्षा जास्त खजूर उपलब्ध असून त्याचा दर 50 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे.