Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KYC Update Fraud: केवायसी अपडेटच्या नावावर सायबर चोरांची लुटमार! अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करूच नका!

KYC Update

नवनव्या तंत्रज्ञानाची समज नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याची प्रकरणे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीची AnyDesk द्वारे फसवणूक झाली होती. असाच प्रकार आता दिल्लीतील एका ज्येष्ठ महिलेसोबत घडला आहे. AnyDesk च्या सहाय्याने सायबर चोरांनी या महिलेच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस आणि OTP घेतला आणि तिच्या खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

गेल्या काही दिवसांपासून सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. सायबर ठग वेगवगेळ्या मार्गातून लोकांची आर्थिक फसवणूक करताना दिसतायेत. आता तर थेट केवायसी अपडेटच्या नावावर नागरिकांना चुना लावण्याचे काम हे सायबर चोर करताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून खातेदारांचे केवायसी अपडेट करणे आरबीआयने अनिवार्य केले आहे. ज्या खातेदारांचे केवायसी अपडेट झालेले नाही अशी खाती बँकांनी बंद देखील केली आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणावी यासाठी आरबीआयने ही मोहीम हाती घेतली आहे. परंतु आपले बँक खाते बंद तर होणार नाही आणि त्यातील पैसे बुडणार तर नाही या भितीपोटी अनेक ज्येष्ठ नागरिक बँकेत जावून केवासी अपडेट करत असतात. मात्र याच भीतीचा फायदा सायबर चोर घेताना दिसतायेत.

नवनव्या तंत्रज्ञानाची समज नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याची प्रकरणे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीची AnyDesk द्वारे फसवणूक झाली होती. असाच प्रकार आता दिल्लीतील एका ज्येष्ठ महिलेसोबत घडला आहे. AnyDesk च्या सहाय्याने सायबर चोरांनी या महिलेच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस आणि OTP घेतला आणि तिच्या खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक

आर्थिक फसवणूक झालेली ही महिला एक ज्येष्ठ नागरिक आहे. तीने काही दिवसांपूर्वी तिच्या खासगी आर्थिक व्यवहारांसाठी चेक दिले होते. त्यांनतर काही दिवसांनी तिला बँकेचा प्रतिनिधी आहे असे सांगत एका व्यक्तीने फोन केला. तुमचे केवायसी अपडेट झालेले नाही त्यामुळे तुमचे बँक खाते बंद केले जाऊ शकते अशी भीती या महिलेला दाखवली गेली. तुम्ही घरबसल्या तुमच्या बँकेचे केवायसी अपडेट करू शकता असे त्या महिलेला सांगितेले गेले. यासाठी AnyDesk द्वारे तुमच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस द्या असे सांगितले गेले. सायबर चोरांनी सांगितलेल्या सगळ्या प्रक्रिया या महिलेने पूर्ण केल्या. सायबर चोराने बँकेच्या अधिकृत वेबसाईटशी साधर्म्य असलेली एक वेबसाईट उघडली, महिलेला विचारून त्यात काही माहिती भरली. त्यांनतर तुम्हांला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल असे सांगितले गेले. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे केवासी अपडेट पूर्ण होईल असे सांगितले गेले. महिलेने ओटीपी शेअर करताच तिच्या बँक खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली.

कशी टाळाल फसवणूक?

केवायसी अपडेट हे बँकेत जाऊन करणे कधीही चांगले. काही बँका ऑनलाईन सुविधा देत असल्या तरी सावधगिरी म्हणून बँकेत जावून केवायसी अपडेट करा. केवायसी अपडेटसाठी तुम्हाला असा कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास त्यात दिलेल्या कोणत्याही लिंकवर अजिबात क्लिक करू नका.

बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगत कुणी कॉल केला तर त्या संबधित व्यक्तीची माहिती विचार, तो कुठून बोलतो आहे? कोणत्या शाखेत कार्यरत आहे, आदी माहिती तुम्ही विचारू शकता. जर समोरील व्यक्ती संशयास्पद वाटत असेल तर सरळ फोन कट करावा व बोलणे टाळावे. तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलवर कुणाशी शेअर करू नका. तुमचा ओटीपी, सिव्हीव्ही नंबर तसेच क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा पिन नंबर शेयर करणे टाळा.

तुमची आर्थिक फसवणूक झाली आहे असे तुमच्या लक्षात आले तर विलंब न करता, शासनाच्या अधिकृत सायबर क्राईम वेबसाइटवर https://cybercrime.gov.in/ ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करून तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीचा तपशील द्या. तसेच सायबर चोरीची घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा. वेळेवर माहिती दिल्यास बँक आणि पोलीस या दोघांनाही फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सोपे जाते.