Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Latest RBI Data: चालू खात्यातील तूट मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली

Huge increase in current account deficit

Image Source : www.commons.wikimedia.org

Huge increase in current account deficit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 दरम्यान, देशाची चालू खात्यातील तूट मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आरबीआयच्या अहवालाचे तपशील पुढे वाचा.

Current Account Deficit widens to 4.4% of GDP: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशाच्या चालू खात्यातील तूटीमध्ये (CAD: current account deficit) मोठी वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान तूट वाढून सकल उत्पन्नाच्या 4.4 टक्के झाला आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार, देशाच्या व्यापार तुटीत झालेली वाढ ही चालू खात्यातील तूट वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चालू खात्यातील तूट 4 पटीने वाढली आहे.
रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान, भारताच्या चालू खात्यातील शिल्लक 36.4 अब्जची तूट नोंदवली गेली, जी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 4.4 टक्के इतकी आहे. त्या तुलनेत एप्रिल ते जून 2022 दरम्यान, देशातील चालू खात्यातील तूट 18.2 अब्ज होती, हे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 2.2 टक्के इतके आहे. सप्टेंबर 2022 ची तुलना मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीशी केली तर आणखी चिंताजनक चित्र समोर येते, ते म्हणजे 2021 मध्ये, देशाची चालू खात्यातील तूट फक्त 9.7 अब्ज होती, जी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 1.3 टक्के इतकी आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीपासून ते 2022-23 च्या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीदरम्यान, तूटीमध्ये जवळपास चार पट वाढ झाली आहे. अर्धवार्षिक आकडेवारी पाहता, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान, देशाची चलन खात्यातील तूट जीडीपीच्या 3.3 टक्के इतकी होती.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, चालू खात्यातील तुटीत ही उडी देशाच्या व्यापारी व्यवसायातील तूट वाढल्यामुळे आली आहे. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत व्यापारी व्यवसाय तूट 63 अब्ज होती, जी जुलै-सप्टेंबर 2022 पर्यंत 83.5 अब्ज झाली. याशिवाय, नकारात्मक निव्वळ गुंतवणूक उत्पन्न हे देखील चालू खात्यातील तुटीला वाढवण्याचे एक कारण आहे.

या काळात देशातील सेवा क्षेत्रांची निर्यात वार्षिक आधारावर 30.2 टक्क्यांनी वाढली ही एक मोठी बाब मानली जाते आहे, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होऊ शकली असती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, सेवा निर्यातीतील वाढ मुख्यत्त्वे सॉफ्टवेअर, व्यवसाय आणि प्रवास सेवा क्षेत्रातील चांगल्या वाढीमुळे झाली, ज्यामुळे अनुक्रमे आणि वार्षिक दोन्ही कमाईत वाढ झाली आहे.