Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NPA Fallen to a Seven Year Low: बँकांचे टेन्शन झाले कमी, वर्ष 2022 मध्ये बुडीत कर्जांचे प्रमाण घटले

Banks NPA Fallen to Seven Year Low

Image Source : www.businesstoday.in

NPA Fallen to a Seven Year Low: रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये बँकांमधील बुडीत कर्जांचे प्रमाण सात वर्षांच्या नीचांकी पातळी पोहोचले. भारतीय बँकिंग क्षेत्र आर्थिकदृष्ट्या मजबूत असून कर्ज वसुलीसाठी प्रयत्नांचे फळ बँकांना वर्ष 2022 मध्ये मिळाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

मागील काही वर्षे बँकांना सतावणाऱ्या बुडीत कर्जांमध्ये (NPA) वर्ष 2022 मध्ये घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये बँकांमधील बुडीत कर्जांचे प्रमाण 5% (Gross Non-Performing Assets) इतके खाली आहे. गेल्या सात वर्षांतील एनपीएचा हा सर्वात कमी स्तर आहे. बुडीत कर्ज कमी होण्याबरोबरच बँकांची भांडवलाची स्थिती मजबूत झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक स्थैर्य अहवालात (Financial Stability Report) बँकांमधील बुडीत कर्जांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे. वर्ष 2022 अखेर जीएनपीए 5% इतके आहे. एकूण मालमतांच्या तुलनेत बँकांमधील बुडीत कर्जांचे निव्वळ प्रमाण 1.3% इतके असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. निव्वळ बुडीत कर्जांचे प्रमाण 10 वर्षांतील नीचांकी पातळीपर्यंत खाली आले आहे.

बुडीत कर्जांचे प्रमाण येत्या काही महिन्यात आणखी कमी होईल, असे आरबीआयने म्हटले आहे. सप्टेंबर 2023 अखेर जीएनपीए 4.9% या स्तरापर्यंत खाली येण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली आहे.

भांडवलाच्या बाबतीत वाणिज्य बँका सुस्थितीत आहेत, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. अर्थव्यवस्था कोरोनातून सावरली आहे. विशेषत: उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. याचा फायजा भारतीय बँकांनी होईल, असे आरबीआयने या अहवालात म्हटले आहे. बँकांची मालमत्तांचा दर्जा सुधारेल. बँका नफ्यात येत असून भांडवलाच्या बाबतीत सदृढ होत आहेत.

दरम्यान, विकसित देशांमधील केंद्रीय बँकांनी महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढीचा सपाटा लावला आहे. कठोर पतधोरणाचा स्वीकार केला जात आहे. त्यातच भूराजकीय अस्थिरता, खासगी क्रिप्टो चलनांकडून वाढती जोखीम आणि पर्यावरणीय बदल यामुळे जगभरातील वित्तीय बाजारांमध्ये जोखीम वाढल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

बँकांचा एकूण नफा यंदाच्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 58717 कोटी इतका वाढला. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत तो 36854 कोटी इतका होता. दुसऱ्या तिमाहीत बँकांच्या कर्ज वितरणात 16.44% वाढ झाली. नोव्हेंबर 2013 नंतर पहिल्यांदाच एका तिमाहीत कर्ज वितरणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. कर्ज वितरणात वाढ होत असल्याने बँकांची उत्पन्न क्षमता वाढल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत बँकांचा परिचालन नफा हा 1,15,000 कोटी इतका होता.