जागतिक क्रिप्टो मार्केटमध्ये आज सोमवारी 20 फेब्रुवारी 2023 रोजी फारसा बदल झाला नाही. बिटकॉइन, इथेरियम या प्रमुख चलनांचा दर स्थिर होता. तर STX या क्रिप्टो कॉइनचा भाव मागील 24 तासांत 87% ने वधारला.
ग्लोबल क्रिप्टो मार्केटची उलाढाल 1.11 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. मागील 24 तासात या मार्केटमधील उलाढाल 0.68% ने कमी झाली. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडा क्रिप्टो कॉइन असलेल्या बिटकॉइनचा आजचा भाव 24346.95 डॉलर इतका आहे. त्यात मागील 24 तासांत 1.38% घसरण झाली. कॉइनमार्केट कॅपनुसार एक बिटकॉइनचा भाव 24396.95 डॉलर आहे. वझीरएक्स या क्रिप्टो एक्सचेंजनुसार भारतीय चलनात बिटकॉइनचा भाव 20 लाख 47 हजार रुपये इतका आहे.
बिटकॉइन खालोखाल दुसरा लोकप्रिय कॉइन असलेल्या इथेरियमच्या किंमतीत देखील मागील 24 तासांत घसरण झाली. इथेरियमचा भाव 0.71% ने कमी झाला आणि तो 1683.06 डॉलर इतका झाला. डॉजकॉइनच्या किंमतीत (Dogecoin) मागील 24 तासात 1.56% घसरण झाली. डॉजकॉइनचा भाव 0.0873 डॉलर इतका आहे. भारतीय चलनात तो 7.40 रुपये इतका आहे.
लिटेकॉइनच्या किंमतीत देखील मागील 24 तासांत 2.29% घसरण झाली आहे. लिटेकॉइन 97.70 डॉलरवर ट्रेड करत आहे. भारतीय चलनात लिटेकॉइनचा मूल्य 8250 रुपये इतके आहे. एक्सआरपीचा भाव 0.3881 डॉलर असून त्यात 0.99% घसरण झाली आहे. सोलाना या क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत मात्र तेजी दिसून आली आहे.
'या' क्रिप्टो चलनांच्या किंमतीत झाली मोठी
कॉइनमार्केट कॅपनुसार आज सोमवारी काही निवडक क्रिप्टोंच्या किंमतीत मोठी वाढ झाली. यात STX हा क्रिप्टो कॉइनचा भाव 87.40% ने वधारला होता. या तेजीनंतर STX चा भाव 0.7648 डॉलर इतका आहे. कॉनफ्लक्स (CFX) या कॉइनच्या किंमतीत आज 46.72% वाढ झाली. कॉनफ्लक्सचा भाव 0.2213 डॉलर इतका आहे. निओ (Neo) या क्रिप्टो करन्सीचा भाव 10.86 डॉलर इतका आहे. त्यात 12.97% वाढ झाली. फाईलकॉइन (FIL) या क्रिप्टो करन्सीचा भाव 10.99% वाढला आहे. फाईलकॉइनचा भाव 8.65 डॉलर इतका आहे. मागील 24 तासांत सोलाना कॉइनचा भाव 10.31% ने वाढला असून तो 25.77 डॉलर इतका झाला. वझीरएक्स नुसार भारतात सोलाना कॉइनचा भाव 2053.23 रुपये इतका आहे.
मागील 24 तासांत ‘हे’ क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त
ब्लर (BLUR) या क्रिप्टो कॉइनच्या किंमतीत मागील 24 तांसात 8.59% घसरण झाली. मिना या कॉइनचा भाव 6.94% ने कमी झाला असून तो 0.9928 डॉलर इतका आहे. रेंडर टोकन या क्रिप्टोच्या किंमतीत 6.75% घसरण झाली असून तो एका कॉइनचा भाव 1.70 डॉलर इतका आहे. दि ग्राफ या क्रिप्टो कॉइनचा भाव 0.1695 डॉलर इतका असून त्यात 6.33% घसरण झाली आहे. लिडो डाओ (LDO) या क्रिप्टो करन्सीचा भाव 3.01 डॉलर इतका असून त्यात 6.12% घसरण झाली आहे.