क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत आज बुधवारी 22 फेब्रुवारी 2023 तेजी दिसून आली. आज बिटकॉइन, इथेरियम या प्रमुख चलनांचे दर वाढले. बिटकॉइनचा भाव 24163.93 डॉलर असून त्यात 0.26% वाढ झाली. इथेरिमयचा भाव 1643.35 डॉलर इतका आहे. मात्र मागील 24 तासांत ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅपमध्ये घसरण झाली.
कॉइनमार्केटकॅपनुसार आज क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइन, इथेरियम, बीएनबी, एक्सआरपी हे कॉइन तेजीत आहेत. डॉजकॉइन, रिपल, लिटेकॉइन, सोलाना या कॉइन्सच्या किंमतींवर मात्र दबाव दिसून आला. आजच्या सत्रात ANKR या क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत 44% वाढ झाली आहे. ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 2.97% कमी झाली असून ती 1.10 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे.
बिटकॉइन आणि इथेरियमध्ये मागील 24 तासांत अनुक्रमे 2.35% आणि 2.36% घसरण झाली होती. मात्र आज दोन्ही कॉइन सावरले. सध्या एक बिटकॉइनचा भाव 24148.14 डॉलर इतका आहे. इथेरियमचा भाव 1642.40 डॉलर इतका आहे. मागील 7 दिवसांत इथेरियममध्ये 5.49% वाढ झाली आहे. आजच्या घडीला इथेरियमची मार्केटकॅप 200934799416 डॉलर इतकी आहे. इथेरियममध्ये सकाळच्या सत्रात 3.28% घसरण झाली होती. इथेरियमचा भाव 1648.93 डॉलर इतका आहे. वझीरएक्सनुसार बिटकॉइनची भारतीय चलनातील किंमत 20.90 लाख इतकी असून इथेरियमची किंमत 1.42 लाख इतकी आहे.
आज डॉजकॉइनच्या किंमतीत 3.58% घसरण झाली. एक डॉजकॉइनचा भाव 0.0849 डॉलर इतका आहे. भारतीय चलनात एका डॉजकॉइनचा भाव 7.38 रुपये इतका आहे. लिटेकॉइनला देखील आज नफावसुलीचा फटका बसला. सध्या लिटेकॉइनचा भाव 94.91 डॉलर इतका आहे. एक्सआरपी कॉइनचा भाव 0.3893 डॉलर असून त्यात 1.15% घसरण झाली. सोलाना या कॉइनमध्ये आज 6.50% घसरण झाली. वझीरएक्सनुसार सोलाना कॉइनचा भाव 24.43 डॉलर इतका आहे.
तिथेर कॉइनचा भाव 1.00 डॉलरवर स्थिर आहे. बीएनबी कॉइनचा भाव 307.78 डॉलर असून त्यात 0.17% घसरण झाली आहे. यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. कार्डानो कॉइनच्या किंमतीत आज 0.34% घसरण झाली असून एक कार्डानो कॉइनचा भाव 0.3857 डॉलर आहे. बायनान्स यूएसडी कॉइनचा भाव 1.00 डॉलर इतका आहे. पॉलिगन कॉइनमध्ये देखील घसरण झाली आहे. एका पॉलिगन कॉइनचा भाव 1.35 डॉलर इतका आहे. पॉलकॉडोट कॉइनचा भाव 7.08 डॉलर असून त्यात 0.69% घसरण झाली.
‘या’ किप्टो करन्सीमध्ये तेजी
आजच्या सत्रात ANKR या क्रिप्टो कॉइनच्या किंमतीत 44.52% तेजी दिसून आली आहे. ANKR या क्रिप्टो कॉइनचा भाव 0.04939 डॉलर इतका आहे. याशिवाय 1inch Network या क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत 5% वाढ झाली. टेझॉसचा भाव 3.13% वाढला असून तो 1.29 डॉलर इतका आहे. बायनरीएक्स या कॉइनचा भाव 2.97% वाढला असून तो 179.49 डॉलर इतका आहे.