Table of contents [Show]
अनेक राज्यांत ओलांडली शंभरी
राज्यात पेट्रोलचा दर तर सरासरी 105 रुपयांपासून पुढे आहे. राजधानी दिल्लीचा (New Delhi) विचार केल्यास इथे पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 प्रतिलिटर असा आहे. हा दर निश्चितच सर्वसामान्यांसाठी खूप जास्त आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल. एमसीएक्सवर याची किंमत 6,035 प्रति बॅरल आहे. तर प्रति लिटर त्याची किंमत 38.19 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाची किंमत ही 37.87 रुपये प्रति लिटर अशी आहे. तर ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 40.56 रुपये प्रति लिटर आहे.
कंपन्या मिळवतायत नफा
या सर्व दरांवर नजर टाकल्यास तीन पट चढ्या दरानं सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळत आहे. किरकोळ (Retail) कंपन्या मात्र यावर प्रचंड नफा मिळवत आहेत. देशातल्या सर्व तीन सरकारी कंपन्यांनीही नफा कमावला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, चालू तिमाहीत या सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे सरासरी 1.2 रुपये मार्जिन कमावलंय. उत्पादन शुल्काच्या रुपानं पेट्रोल आणि डिझेलमधून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात कमाई होते. केंद्र सरकारप्रमाणं राज्य सरकारचाही कर असतो. व्हॅटच्या (Value added tax) माध्यमातून राज्य सरकारे ही कमाई करतात.
उत्पादन शुल्क अन् व्हॅट
उत्पादन शुल्काचा दर काय आहे, हेही पाहुया... सध्या देशात लिटरमागे पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.20 रुपये उत्पादन शुल्क आकारलं जात आहे. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोलवर 25 पासून 35 टक्क्यांपर्यंत तर डिझेलवर 15 पासून 30 टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारला जातो. खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र कच्च्या तेलाचे दर कमालीचे घसरले आहेत. असं असतानाही पेट्रोल-डिझेल दर कमी होण्याचं नाव घेत नाही. दिल्लीतला दर 96-97 आणि 89-90 असला तरी इतर बहुतांशी राज्यात या दरानं 100 ओलांडलीय. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 आणि डिझेलचा दर 94.27 रुपयांवर पोहोचला आहे.
इतर राज्यांतही दर चढेच
तामिळनाडू राज्यात राजधानी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लीटर आहे. साधारणपणे 21 मे 2022नंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. विविध ठिकाणच्या निवडणुका गृहीत धरता या दरांमध्ये बदल करण्यात आलेला नव्हता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            