क्रेडिट कार्डच्या वापराला बँकांकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येते. कार्डच्या वापरावर अनेक सवलती दिल्या जातात. विमान, रेल्वे, बस प्रवास, टॅक्सी प्रवास, शॉपिंग, बील पेमेटंवर या सवलती मिळतात. सणासुदीच्या काळात तर क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक होतो. मात्र, मागील सहा महिन्यांत क्रेडिट कार्डचा वापर कमी झाल्याचे (Credit card spends redused) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यापासून ग्राहकांनी क्रेडिट कार्डच्या वापराकडे पाठ फिरवली आहे. दक्षिण भारतातील ओमान सणानंतर क्रेडिट कार्ड वापरातील घसरण स्पष्ट दिसते.
12 टक्क्यांनी कार्डचा वापर घटला
मागील सहा महिन्यांत आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी क्रेडिट कार्डचा वापर घटला आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक ग्राहकाने सरासरी 14 हजार 280 रुपये क्रेटिड कार्डद्वारे खर्च केले. तर त्याआधीच्या ऑक्टोबर महिन्यात 16 हजार 343 रुपये खर्च केले होते, आरबीआयने जाहीर केलेल्या डेटातून ही माहिती समोर आली आहे. असे असले तरीही, एकंदर क्रेडिट कार्डद्वारे मागचे सलग नऊ महिने 1 लाख कोटी रुपये नागरिकांनी खर्च केले.
एकूण व्यवहारांची संख्या झाली कमी
प्रत्येक कार्डमागे झालेल्या एकून व्यवहारांची संख्याही कमी झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक कार्डमागे 3.2 टक्के व्यवहार झाले होते. ते कमी होऊन नोव्हेंबर महिन्यात 2.9 पर्यंत झाले. याचाच अर्थ ग्राहकांनी क्रेटिड कार्डवरुन शॉपिंग किवा इतर गोष्टींसाठी खर्च करणे कमी केले आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्डचा प्रति कार्ड वापर ऑक्टोबरमध्ये 9 हजार 473 होता. हा आकडा नोव्हेंबरमध्ये कमी होऊन सुमारे 8 हजार 495 पर्यंत खाली आला. सध्या सणासुदीचा काळ संपलेला आहे. तसेच महागाईमुळे ग्राहकांच्या वापरावरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे येत्या काळातही क्रेडिट कार्डवरून ग्राहक कमीच खर्च करणार असल्याचे दिसत आहे.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड हे एक फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट किंवा पर्याय आहे ज्याद्वारे तुम्हाला आगाऊ रक्कम (क्रेडिट) मंजुर असते आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक व्यवहार करणे शक्य होते. तुमच्याकडे पैसे नसतानाही तुम्ही वस्तू विकत घेवू शकता किंवा बील पेमेंट करू शकता. काही ठराविक काळ तुम्हाला व्याजदर आकारला जात नाही. मात्र, त्यानंतर तुम्हाला कार्डवर जेवढे पैसे खर्च केले तेवढे बील पे करावे लागते. अन्यथा दंडही भरावा लागतो. कार्ड इश्यू करणारी बँक ग्राहकाचा सिबिल स्कोअर, क्रेडिट हिस्ट्री आणि उत्पन्न यानुसार क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवत असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर ही एक प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी अर्थात बँकेकडून प्री अप्रुव्ह केलेले क्रेडिट लिमीट आहे.