पारंपारिक शेतीपेक्षा वेगळी पद्धत वापरून किंवा वेगळ्या पिकाची शेती केली तर फायदेशीर होऊ शकते, असा विश्वास ठेवून यशस्वी वाटचाल करणारे उद्योजक म्हणून योगेश शिंदे यांचे नाव घेतले जाते. बांबूची शेती ही वेगळी संकल्पना समोर ठेवून बांबूद्वारे ब्रश, कंगवा तसेच अन्य वस्तू तयार करून व्यवसाय करणारे ‘बांबू इंडिया’ चे प्रवर्तक योगेश शिंदे. जाणून घेऊया त्यांच्यातील यशस्वी उद्योजकाचा प्रवास...
Table of contents [Show]
- आय.टी. क्षेत्रातील तुमच्या कामाचा अनुभव कसा होता?
- ‘बांबू इंडिया’ सुरु करण्याची कल्पना कशी सुचली?
- बांबूपासून ब्रश बनवण्याचे का ठरवले?
- ‘बांबू इंडिया’च्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
- सध्या तुमच्यासोबत किती सहकारी काम करतात?
- ‘बांबू इंडिया’ च्या यशाबद्दल काय सांगाल?
- यशस्वी उद्योजक होण्यासाठी आजच्या पिढीला काय संदेश द्याल?
आय.टी. क्षेत्रातील तुमच्या कामाचा अनुभव कसा होता?
चौदा वर्षाच्या आय.टी. मधील अनुभवामध्ये डेव्हलपर,प्रोग्राम मॅनेजर पासून कंट्री हेड अशा विविध पदांवर काम करता-करता 20 देशांमध्ये मी भ्रमंती केली आणि आय.टी. व्यतिरिक्तही निरीक्षणातून जग बघण्याचा अनुभव घेतला.
‘बांबू इंडिया’ सुरु करण्याची कल्पना कशी सुचली?
मी माझ्या कामातून एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि स्वतःची ओळख निर्माण करणे, भारतातील शेतकऱ्यांच्याबरोबर काम करणे, काहीतरी हटके करताना मानसिक समाधान मिळवणे या उद्देशाने अभ्यास सुरु केला. या काळात मला ‘बांबू’ या पिकाबद्दल माहिती मिळाली आणि 2016 साली मी ‘बांबू इंडिया’ ही कंपनी सुरु केली.
बांबूपासून ब्रश बनवण्याचे का ठरवले?
1938 पासून प्लास्टिक टुथब्रशचा वापर करण्यास सुरुवात झाली. गेल्या 80 वर्षात असंख्य ग्राहकांनी अनेक टुथब्रश वापरले आणि सहा महिन्यांनी फेकून दिल्यावर नवे प्लास्टिक टुथब्रश विकत घेतले. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणापासून वापरून फेकून दिलेले सर्व टुथब्रश या पृथ्वीवर कुठेतरी आहेत ज्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम, प्लास्टिक वापर टाळणे, निसर्गामधून मिळणाऱ्या आणि निसर्गात सहज मिसळू शकणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याबद्दल काहीजण सजग आहेत परंतु, त्यांना पर्याय उपलब्ध नाहीत. म्हणूनच,मी प्लास्टिक टुथब्रशला पर्याय असावा या उद्द्येश्याने बांबूपासून टुथब्रश तयार केले.
‘बांबू इंडिया’च्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
बांबूपासून बनवलेल्या टूथब्रशचे फायदे ग्राहकांच्याडिया’ने 40 लाखांपेक्षा जास्त बांबू टुथब्रश तयार केले आहेत आणि भारताव्यतिरिक्त 18 देशांमध्ये निर्यात केले आहेत. नैसर्गिक बांबूपासून बनवलेला आणि वापर बंद केल्यानंतर निसर्गात मिसळणारा बांबू टुथब्रश भारतामधील 2000 पेक्षा अधिक गावांमध्ये आणि शहरामध्ये पोहोचला आहे.
सध्या तुमच्यासोबत किती सहकारी काम करतात?
2015 साली बांबू टूथब्रश तयार करणारी ‘बांबू इंडिया’ ही भारतातील पहिली कंपनी आहे. आज कंपनीमध्ये 50 कर्मचारी काम करतात, 150 जणांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे 4,500 शेतकऱ्यांबरोबर कंपनी काम करत आहे.
‘बांबू इंडिया’ च्या यशाबद्दल काय सांगाल?
मला शार्क टँकच्या एका एपिसोडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली त्यावेळी बांबू इंडियाला वित्तपुरवठा करण्यास अनेक जज तयार झाले. युनायटेड नेशन्स कडून ‘बांबू इंडिया’ला निमंत्रण मिळाले. बांबू टुथब्रश असे इंटरनेटवर शोधले तर 'बांबू इंडिया'चे टुथब्रश दिसतात जे ऍमेझॉन सारख्या वेबसाईटवरून खरेदी करता येतात. रोज शंभर टुथब्रश तयार करणारी कंपनी आता रोज 50,000 टुथब्रश तयार करते.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आजच्या पिढीला काय संदेश द्याल?
कोणत्याही कॉलेजमध्ये उद्योजक कसे बनावे, यावर फार कमी उद्योजक व्याख्यान देतात. आज त्याचीच गरज आहे, ज्यामुळे युवा वर्गाला उद्योजक बनण्याचे प्रोत्साहन मिळेल. मी सध्या कोणत्याही युवा उद्योजकाला मार्गदर्शन करायला तयार आहे.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक