• 07 Dec, 2022 08:32

Correct bill on purchase of gold: ज्वेलर्सकडून मिळालेले बिल करेक्ट आहे की नाही कसे ओळखायचे

GOLD RATE

Bill On Gold purchase : जेव्हा तुम्ही सोने खरेदी करता तेव्हा फक्त दागिने किंवा नाणी हॉलमार्क (hallmark) केलेले असल्याची खात्री करणे महत्त्वाचे नाही, तर तुम्हाला हे देखील बघावे लागेल की ज्वेलर्स तुम्हाला खरेदीसाठी देत असलेले बिल बरोबर आहे की नाही. त्या बिलमध्ये हवी तेवढी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे की नाही.

विक्रीच्या वेळी होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी Bureau of Indian Standards च्या वेबसाइटनुसार महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्वेलर्सकडून हॉलमार्क केलेल्या वस्तूची ओरिजनल बिले घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया हॉलमार्क केलेल्या दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य बिल काय असावे? ज्वेलर्स विक्रेत्याने जारी केलेल्या चालनामध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. मौल्यवान धातूचे वजन, कॅरेटमधील शुद्धता आणि सूक्ष्मता, हॉलमार्किंग चार्ज यांचा उल्लेख बिलामध्ये करणे आवश्यक आहे.  

उदा. आपण 22 KT ची 8 ग्रॅम सोन्याची चेन खरेदी केली तर बिलावर काय नमूद असले पाहिजे?  

खरेदी केलेल्या वस्तूचे नाव आणि माहिती 

  • सोन्याची चेन(Gold chain)  1  
  • वजन(Weight) (gms): 8 gms  
  • शुद्धता(Purity)  22KTC  
  • सध्याचे सोन्याचे दर आणि मेकिंग चार्जेस हॉलमार्किंग शुल्कः(Current Gold Rates and Making Charges Hallmarking Charges)  45 रुपये (4 मार्च 2022 पासून चार्ज 10 रुपयाने वाढले.)  
  • खरेदीदाराला देय असलेली एकूण रक्कम (Total Amount Due to Buyer)

जर सोन्याच्या चेनला स्टोन जोडलेले असतील, तर ज्वेलर्सने इनव्हॉइसमध्ये स्टोनची किंमत आणि वजन नमूद करणे आवश्यक आहे. जर एखाद्या ग्राहकाला सोन्याच्या शुद्धतेबद्दल शंका असेल, तर तो कोणत्याही बीआयएसला भेट देऊ शकतो. ग्राहकाला टेस्ट चार्ज म्हणून 200 रुपये द्यावे लागतील. 

खरेदीदाराने इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? 

१६ जून २०२१ पासून, ज्वेलर्सना केवळ हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने विकणे बंधनकारक आहे. BIS च्या वेबसाइटनुसार, विक्री आउटलेटच्या बाहेर, नोंदणीकृत ज्वेलर्सने “हॉलमार्क केलेले दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे लिहून असलेला BIS चा लोगो लावावा. BIS द्वारे जारी केलेले नोंदणीचे प्रमाणपत्र ज्वेलर्सने ज्वेलरी शॉपमध्ये ठेवावे.  हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये ग्राहकाला हॉलमार्क दाखवण्यासाठी ज्वेलर्सकडे किमान 10X मॅग्निफिकेशनचा भिंग असणे आवश्यक आहे.