Career Tips : आजच्या काळात प्रत्येकाला जॉब ओरिएंटेड कोर्सेस करण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत अनेकांचा सल्ला घेण्यात येतो. अनेकांचा सल्ला घेण्यापेक्षा आपल्यामधील स्किल ओळखून जर करिअरची निवड केली तर समोरच्या दृष्टीने फायद्याचे असते. अनेक मुलामुलींमध्ये मेकअप, डिझाईन, डेकोरेशन याचे सर्वोत्तम स्किल असते. त्याचाच फायदा घेऊन तुम्ही बारावीनंतर या स्किलशी संबंधित कोर्सेस करू शकता. यातून तुमचा मोठा बिझनेस उभा राहू शकतो. विशेष म्हणजे हे कोर्स करण्यासाठी बारावीमध्ये कोणत्याही शाखेत प्रवेश केलेला चालतो. जाणून घेऊया, या स्किलशी संबंधित कोर्सेस कोणते? त्यासाठी किती फी भरावी लागते?
ब्युटीशियन्स
अनेकांचा असा समज असतो की, करिअर घडवायचे म्हणजे फक्त डॉक्टर, इंजिनियरच व्हायचं. पण तसं नाही अनेक बिझनेस असे आहेत ज्यात डॉक्टर, इंजिनियरपेक्षा जास्त पगार पडतो. बारावीनंतर ब्युटीशियन्सचा कोर्स केल्यास तुम्हाला महिन्याला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. ब्युटीशियन्स कोर्सची फी 3000 ते 5000 रुपयांपर्यंत आहे. या कोर्सची फी ठिकाणानुसार बदलू शकते. हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही स्वतःचे ब्युटी पार्लर ओपन करू शकता. सद्यस्थिती लक्षात घेता ब्युटीशियन्सला खूप डिमांड आहे. घरात कोणताही कार्यक्रम असो घरातील महिला ब्युटीशियन्सकडे जातात.
ड्रेस डिझायनर
गावात या कोर्सला शिलाई मशीन कोर्स म्हणतात. यात सुद्धा अनेक प्रकार असतात. ड्रेस डिझायनर, ब्लाऊस डिझायनर आणखी बरेच काही. आता लग्न समारंभात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कोड असतात. त्याचे ऑर्डर ड्रेस डिझायनरला दिला जातो. ड्रेसच्या क्वालिटी आणि फॅशन नुसार ड्रेस डिझायनर एका ड्रेसचे लाखों रुपये सुद्धा घेतात. ड्रेस डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये फी द्यावी लागेल. यातून तुम्हाला भरपूर इन्कम मिळू शकते.
होम डेकोरेटर
सध्या प्रत्येक सणासमारंभाला घर सजवण्याची पध्दत आहे. लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, वाढदिवस या सर्व कार्यक्रमाला घर सजवण्याची नवीन पद्धत आता रूढ झाली आहे. त्यातही लोकांना बेस्टच पाहिजे असते. हीच गोष्ट लक्षात घेता तुम्ही होम डेकोरेटरचा कोर्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त फी लागणार नाही. पण कमाई मात्र तुम्ही भरपूर करू शकता. एका सजावटीचे 10 हजाराच्या वर चार्ज दिले जाते.