• 05 Jun, 2023 19:23

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Common Mistakes: होमलोन घेताना या कॉमन चुका टाळा!

Home Loan Common Mistakes

Home Loan Common Mistakes: स्वत:चे घर विकत घेणे. ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून कर्ज घेताना काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात कर्ज घेतल्यानंतर त्याचा पश्चाताप करावा लागणार नाही.

Home Loan Common Mistakes: घर घेणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट असते. घर घेताना नियोजन, सर्व्हेक्षण, पैशांची जुळवाजुळव आणि कर्ज याबाबत पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा घर घेताना किंवा घरासाठी कर्ज घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे घर घेताना विशेष करून कर्जाचा पर्याय निवडताना काही गोष्टींची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

स्वत:चे घर विकत घेणे. ही काही जणांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट असते. कारण बऱ्याच जणांना आयुष्याच्या उतारवयातही स्वत:चे घर विकत घेणे जमत नाही. त्यामुळे त्याचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. घरासाठी कर्ज तर घ्यावेच लागते. पण त्याचबरोबर घर घेताना किमान 20 टक्के डाऊनपेमेंट द्यावे लागते. तेवढी रक्कम तरी घर घेताना स्वत:जवळ असावी. त्यामुळे घरासाठी कर्ज काढताना काय करावे आणि काय करू नये याबाबत अवगत असणे आवश्यक आहे. यासाठी काही कॉमन मिस्टेक टाळल्या तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

होम लोन घेताना पात्रता जाणून घ्या

कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर हा खूप महत्त्वाचा भाग मानला जातो. क्रेडिट स्कोअरमधून ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री, त्याची कर्ज फेडण्याची पात्रता तपासली जाते आणि त्यावर आधारित गृह कर्ज वितरित केले जाते. साधारणत: 750 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला क्रेडिट स्कोअर हा चांगला स्कोअर मानला जातो. त्यामुळे होम लोन घेण्याचा विचार तुमच्या मनात येत असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला कसा राहील. यासाठी सजग राहा.  

कर्ज घेण्यापूर्वी मार्केट रिसर्च करा

घरासाठी कर्ज घेताना मार्केटमध्ये कोणकोणत्या बॅंका किती व्याजदराने कर्ज देत आहेत. त्यांचे बेस्ट इंटरेस्ट रेट काय आहेत. रिपेमेंट करण्याची पद्धत काय आहे. तसेच या बॅंका किती रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकतात. याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण होम लोन हे दीर्घकालावधीपर्यंत चालणारे कर्ज आहे. यामुळे आपल्या कुटुंबावर आपल्या खर्चावर त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. त्यामुळे घरासाठी कर्ज घेताना मिळेत त्या बॅंकेतून कर्ज घेऊ नका. कर्ज घेण्यापूर्वी इतर बॅंका काय व्याजदर देत आहेत. कागदपत्रांची पूर्तता कशी करायची. कर्जाची कालावधी काय असेल. व्याजदर फ्लोटिंग योग्य की फिक्स अशी सर्व चौकशी करूनच होम लोनसाठी बॅंकेची निवड करा.

डाऊन पेमेंटसाठी पुरेशी रक्कम जमा करा

जसे आपल्याला माहित आहे, बॅंका जास्तीतजास्त 80 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देतात. म्हणजे आपण पसंत केलेल्या घराच्या एकूण किमतीपैकी बॅंका 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकतात. उर्वरित 20 ते 10 टक्के रक्कम ही आपल्याला उभी करावी लागते. त्याला डाऊन पेमेंट असे म्हटले जाते. एवढ्या रकमेची तरतूद जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर बॅंकेकडून नुसते होम लोन घेऊन फायदा नाही. तसेच घराचे रजिस्ट्रेशन, सरकारकडे भरावी लागणारी स्टॅम्प ड्युटी यासाठी ठराविक रक्कम घर घेताना असावी लागते.

20 ते 25 वर्षे ईएमआय भरण्याची तयारी ठेवा

होमलोन घेण्यापूर्वी त्याचा ईएमआय सतत आणि सलग 20 ते 25 वर्षे भरण्याची तयारी असायला हवी. कारण महिन्याला मिळणाऱ्या पगारातील एक मोठी रक्कम ईएमआयमध्ये खर्च होत असते. यामुळे अनेक प्रकारच्या खर्चावर नियंत्रण आणावे लागते. होम लोन घेतल्यानंतर सुरूवातीची काही वर्षे ही फक्त बॅंकेचे व्याज फेडण्यातच जातात. त्यामुळे कर्ज घेताना याची मानसिक तयार करणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे घरासाठी कर्ज घेताना काही गोष्टींची तयारी करणे गरजेचे आहे. कारण बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून कर्ज घेताना कर्जदाराची पुरती दमछाक होते. कागदपत्रांची पूर्तता करताना काही ना काही गोष्ट राहून जातात. तर काहीवेळेस कर्ज घेतल्यानंतर त्यातील अडचणी लक्षात येतात. त्यामुळे होमलोनसाठी अर्ज करण्यापूर्वी काही कॉमन चुका टाळल्या पाहिजेत.