• 06 Jun, 2023 18:28

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Columbia Pacific Investment : कोलंबिया पॅसिफिक कंपनी करणार 200 कोटींची गुंतवणूक, ज्येष्ठांकरीता आणली विशेष योजना

Columbia Pacific Investment

Image Source : www.google.com

Columbia Pacific Special Scheme : कोलंबिया पॅसिफिक कंपनी ज्येष्ठ राहणीमान प्रकल्पाअंतर्गत 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये खास ज्येष्ठ नागरीकांच्या गरजा आणि सोई लक्षात घेता, निवासी अपार्टमेंट मध्ये विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

CPC Special Scheme For Senior Citizens : ज्येष्ठ आणि वृध्द लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीज (CPC) वरीष्ठांच्या निवासी अपार्टमेंट प्रकल्पांवर 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दोन वर्षात देशभरात असे दोनशे ज्येष्ठ जीवन प्रकल्प उभारायची सीपीसीची योजना आहे आणि हे प्रकल्प नऊ शहरांमध्ये उभारले जातील. CPC (Columbia Pacific Company) कंपनीला प्रत्येक प्रकल्पातून 150 ते 200 कोटी रुपयांचा महसूल मिळविणे अपेक्षित आहे. सध्या हे प्रकल्प बंगलोर, चेन्नई, कोईम्बतूर, कांचीपुरम आणि पाँडिचेरी येथे सुरु आहेत.

ज्येष्ठ राहणीमान प्रकल्प (Senior Living Project)

ज्येष्ठ राहणीमान प्रोजेक्ट हे खास ज्येष्ठ नागरिकांना डोळ्या पूढे ठेवून बांधण्यात आले आहे. या निवासी अपार्टमेंट मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये व्हीलचेअर, अनुकूल दरवाजे, अँटी-स्किड फ्लोअरिंग, अनुकूल लिफ्ट, यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. CPC च्या या  निवासी अपार्टमेंट मध्ये वृध्द व्यक्ती इतर कुणाच्याही मदतीशिवाय जीवन जगू शकतात. तसेच आपली दैनंदिन कामे कुठलीही भिती मनात न बाळगता, आधाराशिवाय करु शकतात.

बेंगळुरुमध्ये पहिला प्रकल्प

पुढील वर्षी बेंगळुरु मध्ये पहिला सहाय्यक प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा मानस आहे,नंतर हा प्रकल्प चेन्नईत सुरु होणार आहे. तसेच, कोलकाता आणि हैदराबाद येथील प्रकल्प प्रगत अवस्थेत असून ते  2023-24 मध्ये सुरु होणार आहे. कंपनी या प्रकल्पातील निवास स्थान भाडे तत्वावर देण्याचा देखील विचार करीत आहे. यासाठी ग्राहकांना ठेव रक्कम जमा करावी लागेल तसेच 25 ते 30 हजार रुपये भाडे द्यावे लागेल. या मॉडलाल देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळेल, कारण परदेशात राहणाऱ्या मुलांच्या आई-वडीलांजवळ सध्या कुणी काळजी घ्यायला नसते. अश्या लोकांसाठी हे अपार्टमेंट फार उपयोगी ठरणार असल्याचा विश्वास कंपनीला आहे.