Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market closed:सेन्सेक्स 168 अंकांनी घसरला, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 10% वाढले

Stock Market Closing Bell

Stock Market Closing Bell: आज सोमवार, दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती, मात्र संध्याकाळी बाजार पडला आहे. दिवसभरातील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून तुम्हाला मिळेल.

Share Market Closed: आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद झाले त्यावेळी बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 168.21 अंकांनी, अर्थात 0.28 टक्क्यांनी घसरून 60 हजार 092.97 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई (NSE) निफ्टी (Nifty) 61.75 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी घसरून 17 हजार 894.85 अंकांच्या पातळीवर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर, आयटी (IT), पॉवर (Power) आणि पीएसयू बँक (PSU Bank) वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हाने बंद झाले. बीएसई (BSE) मिडकॅप (MidCap) आणि स्मॉलकॅप (SmallCap) निर्देशांक सपाट बंद झाले.

हे समभाग सेन्सेक्सवर पडले (These stocks fell on the Sensex)

बीएसई सेन्सेक्सवर (BSE, Sensex), अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) शेअर्समध्ये सर्वाधिक 2.26 टक्क्यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे एनटीपीसी (NTPC), एचडीएफसी (HDFC), एचडीएफसी बँक (HDFC Bank), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL: Hindustan Unilever Limited), मारुती शेअर्स (Maruti), लार्सन अँड टुब्रो (L&T: Larson & Toubro), भारती एअरटेल (Bharati Airtel) आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) लाल चिन्हासह बंद झाले. नायकाचेही (Nykaa) पाच टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

नवीन व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​समभाग 9.78 टक्क्यांनी वाढून 2 हजार 103 रुपयांवर बंद झाले. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही.के.विजयकुमार म्हणाले की, डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 4.95 टक्क्यांवर आणि किरकोळ महागाई 5.72 टक्क्यांवर आल्याने किमतीच्या पातळीत घट दिसून येत आहे. महागाई दरातील या घसरणीचा अर्थ असा आहे की फेब्रुवारीमध्ये 25 बेसिस पॉइंट्सच्या संभाव्य वाढीनंतर, आरबीआय एमपीसीद्वारे (RBI MPC: Reserve Bank of India's Monetary Policy Committee) व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया थांबेल. त्यामुळे वाढीव व्याजदराचा परिणाम सध्या सुरू असलेल्या वाढीच्या वसुलीवर दिसणार नाही.