Citroen C3 Aircross: फ्रेंच कारमेकर सिट्राइन कंपनीने आपली बहुप्रतिक्षित Citroen C3 Aircross ही एसयुव्ही कार भारतात लाँच केली. आकर्षक लूक आणि फिचर्समुळे सिट्राइन कंपनीच्या गाड्यांना अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली आहे. यापूर्वी कंपनीने तीन गाड्या लाँच केल्या असून त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे Citroen C3 Aircross हे चौथे मॉडेल लाँच केले.
कारची किंमत किती?
या कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सिट्राइन शोरूमला जाऊन ही गाडी फक्त 25 हजार रुपये भरून बुक करता येईल. (Citroen C3 Aircross price) 15 ऑक्टोबरपासून गाडीची डिलिव्हरी मिळेल. ही गाडी यू, प्लस आणि मॅक्स अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 9.99 ही किंमत बेस मॉडेलची आहे. टॉप मॉडेलची किंमत किती असेल हे अद्याप कंपनीने जाहीर केले नाही.
डिझाइन आणि फिचर्स
C3 Aircross या नव्या गाडीचे डिझाइन कंपनीच्या आधीच्या C3 मॉडेलशी मिळतेजुळते आहे. पुढील बाजूने ग्रीलवर सिट्राइनचा लोगो आहे. (Citroen C3 Aircross SUV) वाय शेपमध्ये LED डीआरएल लाइट्स, फॉग लँप आहे. 10 इंट इन्फोटेनमेंट स्क्रीन असून त्यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो फिचर दिले आहे. गाडीमध्ये पाच प्रवाशांना बसता येईल, तसेच मागील 2 सीट वाढवून 7 जणांना बसता येईल. तसेच गरज नसेल तेव्हा हे सीट फोल्ड करून ठेवता येतील. मागील सीटवरील प्रवाशांनासुद्धा एसीची हवा मिळेल, अशी सुविधा देण्यात आली आहे.
या गाडीला 1.2 लिटर क्षमतेचे 3 सिलिंडर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन आहे. यातून 110 hp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट होतो. गाडीला 6 स्पीड मॅन्युअल गिअर आहेत.
या गाड्यांना देणार टक्कर
मारुती सुझुकी ग्रँड वितारा, टोयोटा हायरायडर, व्होक्सवॅगस टिग्वान आणि स्कोडा कुशाक, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, होंडा एलेव्हेट या गाड्यांना सिट्राइन C3 Aircross टक्कर देईल.