Citroen C3 Aircross: ऑटो क्षेत्रातील Citroen India लवकरच बाजारात लाँच करणाऱ्या Citroen C3 Aircross SUV मॉडेलची बुकिंग सप्टेंबर महिन्यापासून सुरु करणार आहे. तर ऑक्टोंबरपासून या गाडीची डिलीवरी सुरु केल्या जाईल. Citroen C3 Aircross SUV या गाडीची स्पर्धा मार्केटमधील होंडा एलिवेट सोबत असेल. तसेच कंपनी मध्यम आकारच्या SUV सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.
कुणाशी राहील स्पर्धा
Citroen C3 Aircross लाँच झाल्यानंतर या गाडीची कॉम्पॅक्ट मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, MG Astor, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun या प्रतिस्पर्धक गाड्यांसोबत स्पर्धा असेल.
उत्तम सिटींग स्पेस
Citroen C3 Aircross मॉडेल हे त्याच्या प्रतिस्पर्धक गाड्यांपैकी एकमेव असे मॉडेल असेल ज्यामध्ये 5+2 अशी सिटिंग अरेजमेंट देण्यात आली आहे. म्हणजेच या गाडीमध्ये पाच प्रौढ नागरिकांसह दोन मुलांना सामावून घेण्याची क्षमता आहे. कारण यामध्ये 478 लीटरच्या बूट क्षमतेसह पाच सिटरची स्पेस देण्यात आली आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
Citroen C3 Aircross मॉडेल मध्ये प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट्स, मागील दरवाजांसाठी पॉवर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री, पुश स्टार्ट/स्टॉप बटण आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, व्हेंटिलेटेड सीट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम या गोष्टी प्रामुख्याने देण्यात आलेल्या आहेत.
Citroen C3 Aircross मॉडेल मध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 110hp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडल्या गेले आहे. तसेच ऑप्शन म्हणून स्वयंचलित गिअरबॉक्स देखील दिल्या जाऊ शकते.