SCO Film Festival: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO: Shanghai Cooperation Organization) चित्रपट महोत्सवात, 'चित्रपट पाहण्याच्या अनुभवात भाषेची सुलभता' या विषयावर कार्यशाळा झाली. यात आपल्या आवडत्या भाषेतील कोणताही चित्रपट, सिरीज पाहता यावे यासाठी, सिनेडब्स हे मोबाईल अॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. हे अॅप पहिल्या 10 लाख ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध होईल, ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नुकत्याच पार पडलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या चित्रपट महोत्सवात घोषित करण्यात केली गेली.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'चित्रपट पाहण्याच्या अनुभवात भाषेची सुलभता' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत सिनेडब्स ऍप्लिकेशन सादर करण्यात आले, ज्यामध्ये सिनेफिल्सचा त्यांच्या आवडीच्या भाषेत ऑडिओ देऊन त्यांचा चित्रपट पाहण्याचा अनुभव वाढवण्याची क्षमता आहे. सिनेडब प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये चालणाऱ्या चित्रपटातील भाषेतील अडथळे दूर करून प्रादेशिक किंवा परदेशी भाषांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी देते. ज्याचा वापर घरी आवडीच्या भाषेत चित्रपट आणि ओटीटी शोचा आनंद घेण्यासाठी केला जाऊ शकतो. हे अॅप डिओ टाइमस्टॅम्प ओळखण्यासाठी रेकॉर्ड करते आणि नंतर पसंतीची भाषा प्लेबॅकसह समक्रमित करते, असे सिनेडब्स विकसित करणार्या कंपनी डबवर्क मोबाईल्सचे (Dubswork Mobiles) सह संस्थापक आदित्य कश्यप यांनी चित्रपट महोत्सवात सांगितले.
सदस्यत्त्व आणि जाहिराती मिळवण्याचे उद्दीष्ट (Objective to get subscriptions and advertisements)
सिनेडब चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकसंख्या वाढवून निर्मात्यांसाठी चित्रपटांना किफायतशीर बनवण्यासाठी काम करेल. सिनेडब प्लॅटफॉर्मवर येणारा पहिला चित्रपट आर माधवन यांचा 'रॉकेटरी' आहे. कंपनीचे. अॅप सदस्यत्त्व अर्थात सबस्क्रिप्शन आणि जाहिराती यांच्या आधारे कमाई करण्याचे उद्दीष्ट आहे. मात्र सुरुवातील अॅपचे प्रमोशन करण्यासाठी, पहिल्या 10 लाख ग्राहकांना सिनेबडवरील काँटेंटचा मोफत आनंद घेता येणार आहे. तर, यानंतर सुरुवातील 99 रुपये सबस्क्रिप्शन फी असण्याची शक्यता आहे, मात्र अजुनही यावर पूर्ण निर्णय झालेला नाही.