Christmas & New Year Gift till Rs1000 : आपण क्रिसमस व नवीन वर्षानिमित्त मित्र परिवार व कुटंबासाठी खास गिफ्ट खरेदी करू शकता. हल्ली 1000 रूपये पर्यंत देखील खूप सुंदर, छान व आकर्षक गिफ्ट येतात. त्यामुळे तुमच्या खिशावर जास्त भार देखील पडणार नाही. चला, पाहुयात 1000 रूपयांमध्य़े खास गिफ्ट
Table of contents [Show]
आर्टिफिशियल ज्वेलरी
मुलींना ज्वेलरी हा प्रकार खूप आवडतो. त्यामुळे आपण मुलींसाठी आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करू शकता. आपल्याला बाजारात 1000 रूपयात खूप सारे पर्याय (Options) पाहायला मिळेल. तसेच सध्या क्रिसमस व नवीन वर्षानिमित्त अनेक ऑनलाईन वेबसाइटवर सेल सुरू असेल, त्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत छान अशी ज्वेलरी मिळून जाईल.
फोटो फ्रेम खरेदी करा
आज-काल 1000 रूपयांपर्यंत खूप छान छान फोटो फ्रेम उपलब्ध आहेत. कमीत कमी किंमतीतदेखील आपल्याला मनपसंद फोटो फ्रेम मिळेल. विविध आकारात, रंगात सुबक अशा फोटो फ्रेम बाजारात किवा गिफ्ट शॉपमध्ये पाहायला मिळतील. 200 रूपयांपासून चांगल्या क्वालिटीचे फोटो फ्रेम स्वस्तात मस्त मिळेल.
कॉपी मग हा एक छान पर्याय
हल्ली आपल्याकडे कॉपी मग देण्याची क्रेझ सुरू आहेत. कमी दरात हे सुंदर गिफ्ट खरचं सुखावणारे आहे. कारण कॉपी मगवर तुम्ही एक तुमच्या मैत्रीचा किंवा कुटुंबाचा झक्कास फोटोदेखील प्रिंट करू शकता. यासाठी तुम्ही अगदी घराच्या जवळच्या दुकानातूनदेखील हा कॉपी मग खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसादेखील खर्च करावा लागणार नाही.
सुंदर व आकर्षक टी-शर्ट
बाजारात 100 ते 1000 रूपयांपर्यंतचे खूप छान टी-शर्ट मिळतात. विविध रंगामध्ये हे टी-शर्ट उपलब्ध असतात. एवढेच नाही, तर काही टी-शर्टवर सुंदर मॅसेजदेखील लिहिलेले असतात. मित्र-मैत्रिणींच्या स्वभावाला सूट होणारा असा एखादा टी-शर्टदेखील तुम्ही गिफ्ट करू शकतात. हा टी-शर्ट समोरच्या व्यक्तीलादेखील खूप आवडेल. आताचा ट्रेड पाहता, तुम्ही स्वत:ला व मित्र-मैत्रिणीलादेखील सेम कलरचा टी-शर्ट घेऊ शकतात. ते घालून तुम्ही छानसा फोटो शुट किंवा इंस्टाग्रामवर एखादे रीलदेखील पोस्ट करू शकता.
परफ्युम बॉटल
तुम्ही सहजपणे अगदी स्वस्तात मस्त असे सुगंधित परफ्युम खरेदी करू शकता. मित्र-मैत्रिणींना त्यांचा मनपसंद परफ्युमदेखील देऊ शकता. अनेक ब्रॅंडचे परफ्युम बाजारात उपलब्ध आहेत. सुगंधित परफ्युमसोबत एखादी कॅडबरीदेखील गिफ्ट म्हणून देता येईल.