Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WHO च्या रिपोर्टमधून चीनमधील कोरोनाचं भयंकर वास्तव समोर, आरोग्य व्यवस्थेवर आला ताण

Covid outbreak

Image Source : http://www.thestar.com.my

कोरोनाचा प्रसार झाल्यापासून मागील दोन आठवड्यांमध्ये चीनमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा परिणाम आरोग्यव्यवस्थेवर आह आहे. रुग्णालयामध्ये अनेक बाधितांना भरती करण्याची वेळ येत आहे. कोरोनामुळे 60 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे WHO ने म्हटले आहे.

कोरोना संसर्गाचा उगम आणि प्रसाराची खरी माहिती चीन जगाला देत नाही. तसेच चीनमध्ये कोविड संसर्गाने किती नागरिकांचा मृत्यू  झाला याची आकडेवारी चीनने लपवली असल्याचा आरोप अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी केला होता. 2019 च्या शेवटी झालेल्या कोरोना प्रसारापासून संपूर्ण जग सावरले आहे. मात्र, आता पुन्हा नव्याने चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून झिरो कोविड पॉलिसी राबवण्यात येत आहे. दरम्यान, चीनवरील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

कोरोनाचा प्रसार झाल्यापासून मागील दोन आठवड्यांमध्ये चीनमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा परिणाम आरोग्यव्यवस्थेवर आह आहे. रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांना भरती करण्यात येत आहे. कोरोनामुळे 60 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे WHO ने म्हटले आहे. याबाबत राज्यनिहाय माहिती अद्याप उपलब्ध झाली नसून लवकरच सविस्तर माहिती उपलब्ध केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.

रुग्णालयात भरती होणार्‍यांचं प्रमाण 70% वाढलं (70% covid patient needs to get admitted)

मागील आठवड्यात कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात भरती होण्याची वेळ 70% नागरिकांवर येत आहे. ही एकूण संख्या 63 हजारांपेक्षा जास्त आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची ही संख्या मागील तीन वर्षातील उच्चांकी आहे. कोरोना चीनमध्ये पसरल्यापासून ही सर्वात जास्त विदारक परिस्थिती असल्याचं WHO ने म्हटलं आहे.


कधीपासून कोरोनाचा प्रसार वाढला (When Covid cases increased in China)

2019 साली जगभरात कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर चीन त्यातून लवकर सावरला. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव काही निर्बंध लादले होते. लॉकडाऊन, प्रवासास बंदी आणि कोरोना चाचणी असे निर्बंध पूर्णपणे हटवावे अशी मागणीसाठी चिनी नागरिकांनी डिसेंबरमध्ये आंदोलन केले. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. तेव्हापासून चीनमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाबतची खरी आकडेवारी चीन देत नसल्याचे WHO सह इतरही देशांनी म्हटले आहे.

व्यापारावर परिणाम (Covid impact on tread)

चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत राहीला तर जागतिक उद्योग साखळीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चीनमधून जगभरात कच्चा तसेच तयार माल निर्यात केला जातो. कोरोनामुळे चिनी उत्पादन रोडावले आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढू शकतात. भारतामध्ये इलेक्ट्रिक चीपचा तुटवडा होऊ शकतो. तसेच इतरही इलेक्ट्रिकल उपकरणे, उद्योगांसाठी लागणाऱ्या मशिनरी चीनमधून आयात होतात, त्या आयात होण्यास उशीर होऊ शकतो.