Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

China Covid : EV कार बनवणाऱ्या कंपन्यांना बॅटरींची धास्ती   

China Covid

Image Source : www.autocarpro.in

चीनमधल्या नवीन कोव्हिड उद्रेकामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झालीय. आणि याचा फटका भारतातल्या कार उत्पादनाला आताच बसू लागलाय.

भारतात इलेक्ट्रिक कार बाजारपेठ (E-Vehicle Market) विस्तारतेय. आणि अशा कारचं उत्पादनही देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण, चीनमध्ये अलीकडे नव्याने सुरू झालेल्या कोव्हिड उद्रेकानंतर (China Covid Wave) मात्र इ-कार (E-Car) उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालीय. इलेक्ट्रिक कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीतले बहुतेक सुटे भाग आपण अजूनही चीनमधून आयात करतो.     

आणि देशातल्या इलेक्ट्रिक कारसाठी बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांसमोर आता दोन आव्हानं आहेत. आताच्या चीनमधल्या उद्रेकामुळे आधीच बॅटरीतले सुटे भाग येण्याचं प्रमाण कमी झालंय. आणि जानेवारी महिन्यानंतर चीनमध्ये चायनीज नवीन वर्षाची धूम सुरू होईल. तिथली बाजारपेठ तेव्हा पंधरा दिवसांसाठी जवळ जवळ बंद असेल. त्यामुळे भारतीय बाजारांनाही बसणारा फटका एका महिन्यासाठी असेल.     

भारतीय कंपन्यांनी आतापर्यंत जानेवारी महिन्यात चीनमधून येणाऱ्या मालासाठी करार केलेले आहेत. पण, त्यानंतर चिनी कंपन्यांबरोबर नवीन करार झालेले नाहीत. चीनमधून भारतात कच्चा माल आयात करणाऱ्या कंपन्यांनी तर आताच ही पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली आहे. चीनमधून येणारा माल एकतर कुठेतरी अडकला आहे किंवा चीनमधल्या गोदामात पडून आहे, असं भारतीय आयातदारांचं म्हणणं आहे.     

ट्रोनटेक या कंपनीचे सीईओ समर्थ कोचर यांनी त्यांचा अनुभव सांगितला, ‘चीनमधून कच्चा माल पुरवणाऱ्या कितीतरी लोकांशी माझा संपर्क येतो. पण, या घडीला त्यातले सगळेच कोव्हिडने आजारी आहेत. आणि तिथल्या कंपन्या 50% क्षमतेनं काम करतायत, असं आम्हाला समजलंय.’ ट्रोनटेक ही कंपनी भारतातल्या टू-व्हीलर आणि थ्री-व्हिलर बनवणाऱ्या कंपन्यांना बॅटरी पुरवते. पण, या बॅटरी चीनमधून मागवलेल्या कच्च्या मालातून इथं भारतात असेंबल म्हणजे त्यांची जुळणी केली जाते.     

भारतात बॅटरीसाठी लागणारे सुटे भाग बनवणारी एकही कंपनी नाही. या बॅटरीतला महत्त्वाचा भाग आहे तो लिथिअम आयन सेलचा. गेल्यावर्षी भारताच्या एकूण मागणीपैकी 73% गरज चीनने पूर्ण केली होती. यंदा ओला कंपनीने लिथिअम आयन सेल बनवण्याचा उपक्रम आपल्या तामिळनाडूतल्या कारखान्यात सुरू केला आहे . पण, त्यातून प्रत्यक्ष आयन सेल निर्मिती पुढच्या वर्षीच सुरू होऊ शकणार आहे. आणि निर्माण झालेल्या बहुतेक आयन सेल आणि बॅटरी ओला कंपनीच्या अंतर्गत गरजेसाठीच वापरल्या जातील.     

महत्त्वाचं म्हणजे चीनमधल्या परिस्थितीचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे पुरवठा साखळी नेमकी किती दिवस विस्कळीत असेल आणि त्याचा नेमका परिणाम काय असेल याचा अंदाज अजून आलेला नाही.