New Electric Bike Update: चीनच्या NIU या कंपनीने लहान मुलांसाठी अत्यंत सुंदर व आकर्षक अशी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ती बाजारात सुध्दा खरेदीसाठी उपलब्ध केली आहे. या स्कूटरची किंमत फक्त आठ हजार रूपये आहे. ही स्कूटर भारतातील बाजारात उपलब्ध आहे का, हे पाहूयात.
स्कूटरचे नाव व किंमत (Scooter Name and Price)
NIU या चीनच्या कंपनीने बाजारात आणलेल्या स्कूटरचे नाव Electric Scooter NIU Mavericks NQi असे आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या स्कूटरचा लाँच कार्यक्रम चीनमध्ये पार पडला. या स्कूटरची किंमत फक्त 8,399 रूपये इतकी आहे. ही स्कूटर भारतात लाँच होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. कंपनीने या स्कूटरला Jingdong (JD.com) वर लिस्ट केले आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स (Features of Electric Scooters)
Electric Scooter NIU Mavericks NQi या इलेक्ट्रिक स्कूटरला Mavericks NQi 12V4.5A लेड-एसिड बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यानंतर 5 किमीच्या वेगाने साधारण 90 मिनिट किंवा 7.5km चा धावू शकते. त्यामुळे मुलांना चार्जिंग संपण्याची चिंता राहणार नाही. लहान मुले ही स्कूटर अधिक वेळदेखील चालवू शकतात. ही इलेक्ट्रिक स्कूटर सुंदर व आकर्षक लाइटवेट डिझाइनमध्ये बनविण्यात आली आहे. ही स्कूटर फक्त 11 किलो वजनाची आहे. तसेच ही स्कूटर मेटलने तयार करण्यात आली आहे. या स्कूटरवर 80 किलोची व्यक्ती ही बसू शकते. विशेष म्हणजे या स्कूटरमध्ये यूएसबी आणि एसडी कार्डचे सपोर्ट देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी म्युझिक प्लेची देखील सुविधा दिली आहे. जी लहान मुलांचे मनोरंजन करू शकेल. या ई-स्कूटरमध्ये पुढे जाण्यासाठी, रिव्हर्स घेण्यासाठी आणि पार्किंगसाठी तीन गिअर देण्यात आले आहेत.