Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Remuneration of child actors: मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या बालकलाकारांना मिळतं 'हे' मानधन

Remuneration of child actors

Marathi Child Actors: मालिकेमधील पात्रांबाबत महिलांना सर्वाधिक पडणारा प्रश्न म्हणजे त्यांनी ज्वेलरी, साडी कुठून आणि किती रुपयात घेतली असणार? मग त्यांना हा सुद्धा प्रश्न पडत असणार की, यात काम करणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळत असेल? तर मग यांना मानधन किती मिळत असेल हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Marathi Child Actors: मराठी मालिका (Marathi serial) म्हटलं की गृहीणींना सर्वात जास्त आनंद होतो. काही मालिका तर प्रेक्षकांचा जीव की प्राण आहे. एक दिवस जरी टीव्हीमध्ये बिघाड असला आणि मालिका बघायला मिळाली नाही तर महिला अस्वस्थ देखील होताना दिसतात. मालिकेमधील पात्रांबाबत महिलांना सर्वाधिक पडणारा प्रश्न म्हणजे त्यांनी ज्वेलरी, साडी कुठून आणि किती रुपयात घेतली असणार? मग त्यांना हा सुद्धा प्रश्न पडत असणार की, यात काम करणाऱ्या कलाकारांना किती मानधन (Remuneration)मिळत असेल? तर आपण जाणून घेऊया मराठी मालिकांमधील बालकलाकारांना किती मानधन मिळत. बालकलाकारांमध्ये सर्वांची लाडकी परी म्हणजेच मायरा वैकुळ, त्याचबरोबर चुलबुल असणारी चिंगी म्हणजेच साईशा भोईर आणि सर्वांचे लाडके बाकी कलाकार जाणून घ्या त्यांना मिळणारे मानधन. 

मायरा वैकुळ (Myra Vaikul)

'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेमधील नेहाची मुलगी म्हणजेच परीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मायरा वैकुळ सर्वांच्या परिचयाची आहे. परीच्या गोड स्वभावाने तिने अनेकांना भारावून टाकले आहे. फक्त मालिकेतच नाही तर रियल आयुष्यातही मायरा तेवढीच प्रसिद्ध आहे. रील्स, फोटो, विडियो यांच्या माध्यमातून ती अधिकाधिक हिट होत आहे. instagram वरही मायराचे बरेच फॉलोअर्स आहेत. मायराला तुझी माझी रेशीगाठ या मालिकेत काम  करण्यासाठी 10 ते 12 हजार प्रति दिवस इतके मानधन मिळते. 

साईशा भोईर (Saisha Bhoir)

‘नवा गडी नवं  राज्य’ या मालिकेतील चिंगी म्हणजेच साईशा भोईर, या मालिकेत काम करण्याआधी ती ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत कार्तिकीची भूमिका करत होती तेव्हापासूनच तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे आणि आता तर ‘नवा गडी नवं  राज्य’  या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. साईशाला या मालिकेत काम करण्यासाठी 10 ते 15 हजार इतके प्रत्येक दिवसाला  मानधन मिळते. 

अवनी  जोशी (Avni Joshi)

सर्वात आधी ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी अवनी  म्हणजेच 'तुझेच मी गीत गात आह'  या मालिकेतील पिहू. मल्हार आणि मोनिका यांच्या लाडक्या मुलीची भूमिका साकारणारी अवनी जोशी हिला या मालिकेत काम करण्यासाठी 7 ते 8 हजार रुपये प्रत्येक दिवसाला मिळतात. या मालिकेत अवनीने  थोडी वाईट मुलीची भूमिका केलेली आहे. तिची आतापासून अॅक्टिंग आणि डायलॉग जबरदस्त आहेत त्यामुळे प्रेक्षक तिला जीव लावतात. 

अवनी तायवाडे (Avni Taiwade)

स्वरा, स्वराज आणि अवनी हे तिन्ही एकच आहे अस म्हणायला हरकत नाही म्हणजे, 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील स्वरा म्हणजेच मल्हार आणि वैदहीची मुलगी पण त्यातही ती  वेश बदलवून स्वराजची भूमिका ती सध्या पर पाडत आहे. स्वराजचा गोड आवाज सगळ्यांना भारावून सोडतो, या स्वराजला म्हणजेच अवनीला या मालिकेमध्ये काम करण्याचे प्रत्येक दिवसाला 8 ते 10 हजार रुपये मिळतात. 

अधिरा औंधकर (Adhira Aundhkar)

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील आदु म्हणजेच अधिरा. तिचे गोड गुबगुबीत गाल सगळ्यांना तिच्याकडे खेचून घेतात. या मालिकेमध्ये काम करण्यासाठी अधिराला 5 ते 7 हजार रुपये मानधन  मिळतात. आधिराचे सुद्धा instagram वर बरेच फॉलोअर्स आहेत. 

साईशा साळवी (Saisha Salvi)

'सुख म्हणजे नक्की काय असत?' या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारणारी साईशा साळवी प्रेक्षकांना तिच्या बोबड्या बोलाने आपलसं करून घेते. साईशाला म्हणजेच लक्ष्मीला या मालिकेत काम करण्यासाठी 5 ते 7 हजार रुपये प्रति दिवस असे मानधन मिळतात.