महाराष्ट्राच्या राजकारणातलं नेहमीच चर्चेत असलेलं नाव म्हणजे उदयनराजे भोसले. राजकारण, उद्योग आणि समाजसेवेत अग्रेसर असलेले उदयनराजे आपल्या बोलण्यामुळे कायम चर्चेत राहिले आहेत. उदयनराजे हे दोनवेळा खासदार राहिले आहेत. सध्या भाजप कोट्यातून ते राज्यसभेत नियुक्त झालेले आहेत. खासदार उदयनराजे हे अब्जावधी संपतीचे मालक असल्याचे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून दिसते. अनेकदा खासदारांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे आपल्याला दिसते.
उदयनराजे भोंसले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत, त्यांनी 2020 साली राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना ₹201.42 कोटी पेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जाहीर केली आहे. उदयनराजे यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून राज्यसभेची (आरएस) निवडणूक लढवली होती, तेव्हा ही माहिती त्यांनी दिली होती. सोबतच त्यांच्यावर कर्ज म्हणून ₹ 1.82 कोटीचे दायित्व असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. उदयनराजे यांच्याकडे 16.21 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 185.21 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेत त्यांची पत्नी दमयंतीराजे, आणि त्यांची मुलगी नयनतारा यांच्या मालकीचे समभाग देखील समाविष्ट आहेत.
तसेच त्यांच्यावर 23 वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. उदयनराजे भोसले आणि त्याचा पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी मिळून व्यवसाय देखील सुरू केला असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली गेली आहे. महत्वाचे म्हणजे बिटकोईनमध्ये दमयंतीराजे यांच्या नावाने देखील 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे देखील या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.कुटुंबाकडे हिऱ्यांच्या सेटसह दागिने आणि ₹ 2.54 कोटी किमतीची दागिने आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिज्ञापत्रानुसार संपत्ती :
खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे वारसाप्राप्त मालमत्ता ₹ 158.57 कोटी किमतीची आहे तर जंगम मालमत्ता 12 कोटी 31 लाख 84 हजार 384 रुपयांची आहे. उदयनराजेंच्याकडे मर्सिडिज बेन्ज, ऑडी , इन्डिवर, मारुती जिप्सी या अलिशान गाड्या असून त्यांची किमंत 91 लाख 70 हजार इतकी आहे.
उदयनराजे भोंसले यांच्या मालमत्तेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ₹ 2 कोटींनी वाढ झाली आहे असे दिसते. एप्रिल 2019 मध्ये, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी, भोंसले यांनी ₹ 199 कोटींची संपत्ती जाहीर केली होती आणि ते राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक होते.