Home Loan: स्वत:चे घर घेण्याचे स्वप्नं प्रत्येकाचेच असते, परंतु सततच्या वाढत्या महागाईच्या काळात स्वत:च्या पैशातून किंवा बचतीतून घर घेणे थोडे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत मोठी रक्कम उभी करण्यासाठी गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. पण गृहकर्जासाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर विविध प्रकारचे आर्थिक धोके टाळता येऊ शकतात आणि व्याजदरही कमी करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया असेच काही उपाय.
Table of contents [Show]
कमी व्याजदर कुठे मिळेल ते बघा
अनेक बँका आणि NBFC कंपन्यांमार्फत वेगवेगळ्या व्याजदरांवर गृहकर्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्वात कमी कर्ज दर देणाऱ्या बँका आणि कंपन्या कोणत्या? हे तपासणे गरजेचे आहे.
High CIBIL स्कोअर येईल कामात
तुमचा चांगला CIBIL स्कोअर हे दर्शवतो की, तुम्ही याआधी घेतलेलं कर्ज वेळेवर भरलं आहे. बँका अनेकदा वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकांना किंवा ज्यांची Credit History मजबूत आहे, त्यांना प्राधान्याने कमी व्याजदर देतात. त्यामुळे तुमचा स्कोअर 800 च्या जवळपास असल्यास, तुम्हाला कमी व्याजदरासह कर्ज मिळू शकते.
डाऊन पेमेंट जास्त करा
जर तुम्ही होम लोनसाठी अर्ज करताना तुमचे डाऊन पेमेंट वाढवले, तर क्रेडिटची रक्कम कमी होते. हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे, कारण कमी रक्कमेमुळे शेवटी स्वस्त व्याजदर आणि लक्षणीयरीत्या कमी EMI महिन्याला आपल्याकडे येते. त्याची परतफेड करणे सोपे जाते.
क्रेडिट टर्मचा कालावधी कमी ठेवा
कमी क्रेडिट परतफेडीचा कालावधी थोडा जास्त EMI सह येतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्रेडिटची लवकरात लवकर परतफेड केल्यास एकूण व्याजाची रक्कम कमी होते. परंतु वेळेवर EMI भरणे अशक्य होत असेल, तर फार कमी कालावधीच्या EMI ची निवड करु नये.
EMI मध्ये बदल करत राहा
भविष्यात तुमचे उत्पन्न वाढल्यास आणि बँक तुम्हाला दरवर्षी मासिक पेमेंटमध्ये बदल करण्याची परवानगी देत असल्यास, तुम्ही आणखी जास्त रक्कम भरता येईल, असे EMI निवडू शकता. तुमच्या गुहकर्जाचा EMI वाढल्याने तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होईल आणि परिणामी तुम्हाला कमी व्याजाची रक्कम भरावी लागेल.
कर्ज ट्रान्सफर करा
गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी एक विशेष उपाय म्हणजे कर्ज हस्तांतरित करणे. या प्रक्रियेत, थकित कर्जाचा उर्वरित भाग कमी व्याजदराने दुसऱ्या वित्तीय संस्थेकडे हस्तांतरित केला जातो. असे केल्यास तुमचे मासिक पेमेंट जे आधी होते ते कमी करण्यात मदत करते.