Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 10 Richest People in World: जगातल्या सर्वात श्रीमंत दहा जणांच्या यादीत एकमेव भारतीय मुकेश अंबानी, ते ही दहावे!

Richest People

ब्लूमबर्गच्या एका नव्या अहवालानुसार टेस्ला (Tesla) आणि ट्विटरचे (Twitter) प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांनी LVMH चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकत जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जागा पटकावली आहे.

आज जाणून घेऊयात जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांची यादी. विशेष म्हणजे या यादीत मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत! ब्लूमबर्गच्या एका नव्या अहवालानुसार टेस्ला (Tesla) आणि ट्विटरचे (Twitter) प्रमुख  इलॉन मस्क (Elon Musk) यांनी LVMH चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकत जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जागा पटकावली आहे. दरम्यान, अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांची संपत्ती $43.4 अब्ज (3 लाख 57 हजार कोटी रुपये) पर्यंत घसरल्यानंतर ते जगातील पहिल्या 30 श्रीमंत व्यक्तींच्या यादीबाहेर गेले आहेत.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी, जे अलीकडे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 33 व्या क्रमांकावर घसरले आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकत्रित मूल्य नुकतेच $100 अब्ज (रु. 8 लाख 24 हजार कोटी) च्या खाली आले आहे. दरम्यान, रिलायन्सचे प्रमुख  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे 2023 मधील जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झालेले एकमेव भारतीय आहेत. जाणून घेऊया संपूर्ण यादी.

हे आहेत 2023 मधील टॉप 10 सर्वात श्रीमंत लोक!

1. एलोन मस्क (Elon Musk)- $187 अब्ज

elon-musk-1.jpg

ब्लूमबर्गच्या नव्या अब्जाधीश व्यक्तींच्या निर्देशांकानुसार , एलोन मस्क यांनी गेल्या वर्षी सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या लुई व्हिटॉनचे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट (Louis Vuitton CEO Bernard Arnault) यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 दरम्यान मस्क यांची एकूण संपत्ती $200 अब्ज (रु. 16 लाख 48 हजार कोटी) नी घसरली होती. परंतु, टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने मस्क यांना पहिल्या स्थानावर येण्यास पुन्हा संधी मिळाली. टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख असलेल्या मस्क यांची एकूण संपत्ती आता $187 अब्ज (15 लाख 41 हजार कोटी) इतकी आहे, जी बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या $184 अब्ज (15 लाख 17 हजार कोटी) संपत्तीपेक्षा कमी आहे.

2. बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब (Bernard Arnault and Family)- $184 अब्ज

bernard-arnault-and-family.jpg

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार,  2023 मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती LVMH चे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट हे आहेत, त्यांची एकूण संपत्ती $184 अब्ज (रु. 15 लाख 17 हजार कोटी) इतकी आहे. फ्रेंच अब्जाधीश असलेले बर्नार्ड डिसेंबर 2022 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते आणि दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ ते या यादीत शीर्षस्थानी राहिले होते. मात्र, त्यांना पुन्हा एकदा मस्क यांनी मागे टाकले आहे. LVMH ही जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तूंची कंपनी आहे, ती जवळपास 70 फॅशन आणि कॉस्मेटिक्स ब्रँड्सचा व्यवसाय करते.

3. जेफ बेझोस (Jeff Below) - $117 अब्ज

jeff-bezos.jpg

Amazon चे संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष आणि माजी CEO, अमेरिकन अब्जाधीश  जेफ बेझोस हे $117 अब्ज (9 लाख 64 हजार कोटी) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझोस यांनी 1994 मध्ये ई-कॉमर्स कंपनी Amazon ची स्थापना केली आणि जुलै 2021 मध्ये त्यांनी कंपनीचे सीईओ पद सोडले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. 2022 मध्ये Amazon ची कमाई $514 अब्ज (रु. 42 लाख 37 हजार कोटी) इतकी होती, असे ब्लूमबर्गने म्हटले आहे .

4. बिल गेट्स (Bill Gates)- $114 अब्ज

bill-gates.jpg

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक (Co-Founder of Microsoft), अमेरिकन उद्योगपती आणि गुंतवणूकदार  बिल गेट्स यांची एकूण संपत्ती $114 अब्ज (9 लाख 39 हजार कोटी रुपये) इतकी आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार गेट्स यांच्याकडे सुमारे $28.6 बिलियन (रु. 2 लाख 30 हजार) किमतीचा मायक्रोसॉफ्ट स्टॉक आहे, जो कंपनीच्या एकूण स्टॉकच्या तुलनेत 1% पेक्षा अधिक आहे. 2000 मध्ये, त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ट्रस्टची (Bill and Melinda Gates Foundation Trust) स्थापना केली, गेट्स फाऊंडेशने गेल्या काही दशकांमध्ये अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

5. वॉरेन बफे (Warren Buffet)- $106 अब्ज

warren-buffet.jpg

अमेरिकन उद्योगपती  वॉरन बफे, हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. $106 अब्ज (8 लाख 74 हजार कोटी) संपत्तीसह जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची गणना होते. सध्या बर्कशायर हॅथवेचे (Berkshire Hathway) अध्यक्ष आणि सीईओ आहेत. तसेच ते बॅटरी निर्माता कंपनी ड्युरासेल (Duracell) आणि विमा कंपनी गीको (Geico) यासह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. 92 वर्षीय बुफे यांनी 2006 मध्ये घोषणा केली की ते बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला त्यांच्या संपत्तीपैकी 83% दान करण्याची योजना आखत आहेत.

6. लॅरी एलिसन (Larry Ellison) - $102 अब्ज

larry-ellison.jpg

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल कॉर्पोरेशनचे (Oracle Corporation) सह-संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी,  लॅरी एलिसन यांची संपत्ती 102 अब्ज डॉलर (8 लाख 40 हजार कोटी रुपये) इतकी आहे. फोर्ब्सच्या मते, एलिसन यांच्याकडे ओरॅकल या टेक कंपनीचे सुमारे 35% शेयर आहेत.सोबतच टेस्लाचे सुमारे 15 दशलक्ष शेअर्स देखील आहेत.

7. स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer)– $89.4 अब्ज

steve-ballmer.jpg

मायक्रोसॉफ्टचे 2000 ते 2014 पर्यंतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले, अमेरिकन उद्योगपती आणि गुंतवणूकदार  स्टीव्ह बाल्मर यांची संपत्ती $89.4 अब्ज (7 लाख 34 हजार कोटी रुपये) इतकी आहे. 66 वर्षीय बाल्मर सध्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या लॉस एंजेलिस क्लिपर्सचे मालक देखील आहेत. एक गुंतवणूकदार म्हणून, बाल्मर यांनी 2018 मध्ये $59 दशलक्ष (रु. 4 लाख 86 हजार कोटी) रुपयांची सर्वात मोठी गुंतवणूक सोशल सोल्युशन्समध्ये (Social Solutions) केली. ही कंपनी ना-नफा, ना-तोटा तत्वावर सरकारी संस्थांसाठी सॉफ्टवेअर बनवते.

8. लॅरी पेज (Larry Page) - $84.7 अब्ज

larry-page-1.jpg

गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज हे 2023 मध्ये जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती $84.7 अब्ज (7 लाख 92 हजार कोटी) इतकी आहे. पेज यांनी 2019 मध्ये Google ची पालक संस्था Alphabet चे CEO पद सोडले पण तरीही ते त्यांच्या प्रमुख भागधारकांपैकी एक आहेत. एक गुंतवणूकदार म्हणून,लॅरी पेज यांनी अंतराळ संशोधन कंपनी प्लॅनेटरी रिसोर्सेसमध्ये (Planetary Resources) केलेली त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक होती.

9. कार्लोस स्लिम (Carlos Slim) - $83.3 अब्ज

carlos-slim.jpg

कार्लोस स्लिम हेलु (Carlos Slim Helu)  हे एक मेक्सिकन व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. फोर्ब्सने 2010 ते 2013 दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून यांना स्थान दिले होते.  2023 पर्यंत, ते $83.3 अब्ज (रु. 6 लाख 84 हजार कोटी) संपत्तीसह, श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अब्जाधीश असलेल्या कार्लोस आणि त्याच्या कुटुंबाची अनेक मेक्सिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक त्यांची बहु-उद्योग कंपनी - ग्रुपो कार्सो (Grupo Carso)मार्फत केली जाते. या कंपनीत त्यांचे मोठ्या प्रमाणावर होल्डिंग असून त्यांचा 79% हिस्सा आहे. न्यूयॉर्क टाइम्सची विक्री करण्यापूर्वी स्लिम यांच्याकडे 17% मालकीही होती .

10. मुकेश अंबानी (Mukesh Ambani)- $81 अब्ज

mukesh-ambani-1.jpg

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार या यादीतील एकमेव भारतीय मुकेश अंबानी आहेत ज्यांची संपत्ती $81 अब्ज (6 लाख 67 हजार कोटी रुपये) इतकी आहे . बाजार मूल्यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ओळखली जाते. या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून मुकेश अंबानी काम बघत आहेत. त्यांच्याकडे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची मालकी देखील आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ऊर्जा, नैसर्गिक वायू, दूरसंचार, कापड, आरोग्य आणि किरकोळ व्यापार यासह विविध क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवत आहे.