Lowest loan rate: हक्काचं घर किंवा आवडत्या कारचं स्वप्न पूर्ण करायचं असो. तसेच अचानक उद्भवलेल्या अडचणींचा सामना करायचा असल्यास देखील पैशांची गरज भासते. मोठे आर्थिक निर्णय घेताना सहसा बँकेचं दार ठोठवावं लागतं. घर घेताना तर हमखास गृहकर्जाचा पर्याय अनेकजण निवडतात. मात्र, योग्य बँक निवडताना अनेकांची दमछाक होते.
कमीत कमी व्याजदर कोठे मिळेल जेणेकरून कमी इएमआय भरावा लागेल, याकडे सर्वांचा कल असतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहकाची आर्थिक स्थिती, कर्जाची रक्कम पाहून व्याजदर आकारते. होम, कार आणि पर्सनल लोन घेताना सर्वात कमी व्याजदर कोठे मिळू शकतो ही माहिती चेक करा.
गृहकर्ज व्याजदर
सेंट्रल बँकेकडून सर्वात कमी 8.50 टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध होत आहे. त्याखालोखाल स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक 8.50% दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. इतरही काही बँकाचे व्याजदर किंचित जास्त आहेत. खालील टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता.
पर्सनल लोन व्याजदर
अचानक उद्धभवलेली आणीबाणी किंवा गरज भागवण्यासाठी पर्सनल लोनचाही अनेकजण पर्याय स्वीकारतात. कार लोन आणि होम लोनपेक्षा तुलनेने पर्सनल लोनचे व्याजदर जास्त असतात. बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी म्हणजे 10% व्याजदराने पर्सनल लोन देत आहे. पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक, IDFC बँक, इंडसंड बँक यांचे व्याजदर थोडे जास्त आहेत.
कार लोन व्याजदर
तुम्हाला कार घ्यायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत आहे. त्या खालोखाल युको बँक 8.70% दराने कर्ज देत आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ICICI, HDFC, इंडियन ओव्हरसिज बँक, युनियन बँक यांचे कार लोनचा व्याजदर थोडा जास्त आहे. बँक कर्ज देताना अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि इतरही काही गोष्टी तपासते. त्यानंतर व्याजदर ठरवते. त्यामुळे बँकेसोबत संपर्क साधून तुम्हाला निश्चित किती व्याजदर मिळेल, ते पहावे लागेल.
टीप - वर दिलेले व्याजदर बँकेच्या नियमानुसार बदलू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकेशी संपर्क साधा. वरील व्याजदर हे फक्त माहितीसाठी दिले आहेत.