Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kindle books by ChatGPT: ॲमेझॉन किंडलवर ChatGPT द्वारे लिहलेल्या पुस्तकांचा भरणा; लेखकांसह आणखी कोणाची कामं जाणार?

ChatGPT authors Book

Image Source : www.atriainnovation.com

ॲमेझॉन किंडलवर दोनशे पेक्षा जास्त पुस्तकं आहेत ज्यांचा लेखक ChatGPT हा AI चॅटबॉट आहे. हे पुस्तक एकतर चॅटजीपीटीने पूर्णपणे लिहलेली आहे, किंवा लेखकाला पुस्तक लिहण्यात या AI बॉटने मदत केलीयं. भविष्यात या पुस्तकांची संख्या वाढू शकते. मात्र, याचा लेखकांच्या कामावर परिणाम होऊ शकते. तसेच इतरही अनेक नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.

Kindle books by ChatGPT: ॲमेझॉन किंडलवर अशी दोनशे पेक्षा जास्त पुस्तकं आहेत ज्यांचा लेखक ChatGPT हा AI चॅटबॉट आहे. हे पुस्तकं एकतर चॅटजीबीटीने पूर्णपणे लिहलेली आहेत, किंवा लेखकाला पुस्तक लिहण्यात AI बॉटने मदत केलीयं. या पुस्तकांची संख्या 200 पेक्षा जास्तही असू शकते. कारण, नक्की किती पुस्तके AI द्वारे लिहली आहेत, याची ठोस माहिती समोर आली नाही. (Amazon's Kindle AI books) त्यामुळे तुम्ही भविष्यात ऑनलाइन एखादे पुस्तक वाचत असाल तर ते चॅटजीपीटी सारख्या टूलने तर लिहले नाही ना? याची खात्री करून घ्या.

AI Chatbot द्वारे पुस्तकांचे लेखन

किंडल स्टोअर हा ॲमेझॉनचा बुक रिडिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यावर अनेक ऑनलाइन बुक्स (AI Chatbot Books)वाचायला मिळतात. ऑडिओ बुक्सही तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र, यातील काही बुक्स तुमच्या आवडत्या लेखकाने नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहलेली असतील. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे शक्य झालं असलं तरी यामुळे लेखन क्षेत्रातील जॉबच्या संधी, व्हॉइस ओव्हर, रेकॉर्डिंग क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. जे काम मशिनद्वारे होतं त्यासाठी कंपन्या पैसे का खर्च करतील हा प्रश्न आहे.

लेखकांचे करियर धोक्यात

AI द्वारे बुक लिहण्याच्या या पद्धतीचा अमेरिकेतील रायटर्स गिल्ड या संघटनेने निषेध नोंदवला आहे. कारण AI द्वारे विविध शॉर्ट स्टोरीज, लहान मुलांच्या गोष्टी, मार्गदर्शनपर पुस्तके, टेक्निकल ज्ञानासंबंधीत पुस्तके यांसह विविध विषयांवर पुस्तके लिहता येऊ शकतात. एवढंच काय AI द्वारे कविताही काही सेकंदात केली जाऊ शकते. त्याचा परिणाम क्रिएटिव्ह जॉब इंडस्ट्रीवर होऊ शकतो.

एलन मस्क यांचा चॅटजीपीटीला विरोध 

ChatGPT द्वारे देण्यात येणारी माहिती पक्षपातीपणाची, चुकीची किंवा परिपूर्ण नसू शकते, असेही बोलले जात आहे. नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी चॅटजीपीटीबाबत एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की, आपल्याला चॅटजीपीटी नाही तर ट्रुथ जिपीटीची गरज आहे. चॅटजीपीटीद्वारे खरी माहिती दिली जात नाही, असे बोलण्याचा त्यांचा रोख होता. एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प या व्यक्ती वादग्रस्त असल्याचे चॅट जीपीटीने एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते. तर जेफ बेझोस आणि बायडेन यांना वादग्रस्त नसल्याचे म्हटले होते. एका ट्विटर युझरने एलन मस्क यांना टॅग करत हे ट्विट शेअर केले होते.

किंडल ग्राहकांना सबस्क्रिप्शनद्वारे वापरता येऊ शकते. त्यासाठी विविध प्लॅन ग्राहकांसाठी तयार करण्यात येतात. त्याअंतर्गत किंडल बुक्स वाचता येतात. आता यामध्ये पूर्णपणे AI द्वारे किंवा AI च्या मदतीद्वारे लिहलेली बुक्स तुम्हाला आढळतील.

फ्रिलान्सर्स आणि लेखकांच्या करिअरवर काय परिणाम होणार?

AI द्वारे लिहण्यात येणाऱ्या कंटेटमुळे, भाषांतर तसेच कृत्रिम आवाजात पुस्तक रेकॉर्ड करण्याच्या क्षमतेमुळे अनेक नोकऱ्यांवर आणि कामाच्या संधींवर गदा येण्याचा शक्यता आहे. पुस्तक लिहण्याचे काम हे बऱ्याच वेळा फ्रिलान्स तत्वावर केले जाते. मात्र, जर भविष्यात शॉर्ट स्टोरी बुक्स किंवा इतर प्रकारच्या पुस्तकांची गरज पडली तर आघाडीच्या अॅप्सद्वारे ही पुस्तके AI द्वारे लिहण्यात येतील.

ऑडिओ बुक्स Voice over आर्टिस्टकडून रेकॉर्ड करुन घेतली जातात. मात्र, आता AI तंत्रज्ञानामुळे (Kindle books by ChatGPT) हुबेहुब व्यक्तीच्या आवाजात AI पुस्तक रेकॉर्ड करू शकते. वाचकाला हे समजणार देखील नाही ऑडिओ बुक AI द्वारे रेकॉर्ड करण्यात आले आहे. महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुळे यांच्या आवाजाची AI voice मॉडेल्स कंपन्यांकडून तयार करण्यात आली आहेत.