रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी (दि.7 डिसेंबर) ट्रेडिंगच्या वेळेत बदल करून त्यात वाढ केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. यामध्ये वेगवेगळ्या मार्केट रेग्युलेटरचा समावेश करण्यात आला आहे. आरबीआयने कॉल / नोटीस / टर्म मनी / कर्मशिअल पेपर / डिपॉझिट सर्टिफिकेट, रुपी इंटरेस्ट रेट डेरिव्हेटीव्हस आणि कॉर्पोरेट बॉण्डशी संबंधित मार्केटच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात (Press Releases) नमूद करण्यात आले आहे.
2020 मध्ये कोविड काळात ट्रेडिंग वेळेत बदल!
रिझर्व्ह बॅंक इंडियाने कोविड संसर्गाच्या काळात म्हणजे एप्रिल 2020 मध्ये शेअर मार्केटमधील काही व्यवहारांच्या ट्रेडिंगच्या वेळेत बदल केले होते. आरबीआयने त्याची वेळ कमी केली होती. एप्रिल 2020च्या अगोदर सर्व हे व्यवहार 5 वाजेपर्यंत सुरू असायचे. पण कोविडमुळे त्यावर निर्बंध घालण्यात आली होती. ती निर्बंध आता आरबीआयने उठवली आहेत.
ट्रेडिंगचे नवीन वेळापत्रक 12 डिसेंबरपासून लागू होणार!
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कॉल / नोटीस / टर्म मनी / कर्मशिअल पेपर / डिपॉझिट सर्टिफिकेट, रुपी इंटरेस्ट रेट डेरिव्हेटीव्हस आणि कॉर्पोरेट बॉण्डशी संबंधित मार्केट बंद होण्याची वेळ आता 5 वाजेपर्यंत असणार आहे. हे नवीन टाईमटेबल 12 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
शेअर मार्केट/ऑप्शन ट्रेडिंग वेळत बदल नाही
जे सर्वसामान्य ट्रेडर नियमित शेअर किंवा ऑप्शन ट्रेडिंग करत आहेत. त्यांच्या वेळेमध्ये बदल झालेला नाही. आरबीआयने बदल केलेली वेळ ही बहुतांश बिझनेस टू बिझनेस (Business 2 Business – B2B) व्यवहारांशी संबंधित आहे.