Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Will Global Recession Affect India: जागतिक मंदीची शक्यता, पण भारताला होणार फायदा

Will Global Recession Affect India

Image Source : http://www.businessworld.in/

Will Recession Hit Indian Economy: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ((WEF) मुख्य अर्थशास्त्री सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात नुकताच एक खुलासा करण्यात आला आहे की, जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे, पण याचे चटके भारताला बसणार नाही याउलट भारताला याचा फायदा होणार आहे.

Will India go into recession 2022: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) ने नुकतेच चीफ इकॉनॉमिस्ट फोरकास्ट सर्व्हेमध्ये खुलासा केला आहे की, 2023 म्हणजे यावर्षी जागतिक मंदीचे सावट आणखी गडद होणार आहे. मात्र याचा परिणाम भारतावर होणार नाही. याउलट या देशाचा फायदाच होणार असल्याचा खुलासा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

कसा होणार भारताला फायदा (How India will Benefit)

2023 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या काळात अन्नपदार्थ, ऊर्जा यासंदर्भात महागाईत मोठया प्रमाणात वाढ होणार आहे. या कालावधीत भारत आणि बांगलादेशसोबतच दक्षिण आशियातील काही देशांना या जागतिक आर्थिक मंदीचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण हे देश भारतासारख्या कमी खर्चाच्या देशाकडे वळण्याची शक्यता आहे. आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जगातील अनेक कंपन्या आपल्या खर्चात लक्षणीय कपात करणार आहे. जागतिक उत्पादन पुरवठा साखळीतील चीनचे वर्चस्वदेखील कमी होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. याचा फायदा भारताला होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

युरोप व अमेरिकेवर होणार परिणाम (Europe and America will be Affected)

सर्वेक्षणानुसार 2023 मध्ये युरोपमध्ये कंपन्या या कमकुवत होताना दिसणार असल्याची शक्यता मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली. तर अमेरिकेतदेखील हीच परिस्थिती निर्माण होणार आहे. चीनवरदेखील याचा काहीसा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या योगदानात वाढ (Increasing India's Contribution to the Global Economy)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने सांगितले आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचा हिस्सा 2022 मध्ये 3.4%  होता. यावरून तो यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 3.6% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 2000 मध्ये तर तो फक्त 1.4% होता. यावरून जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान वाढले असल्याचे लक्षात येते.