Century Plyboard earned a profit of Rs 313.15 crores: प्लायवुड क्षेत्रातील भारतातील 40 वर्षे जुनी कंपनी, सेंच्युरी प्लायबोर्ड. 2022 या वर्षात कंपनीच 3 हजार 50 कोटींची उलाढाल झाली आहे, ज्यातून कंपनीला 313.15 कोटी रुपयांचा नफा झाला. एवढी मोठी उलाढाल घडवून आणण्यासाठी कंपनीला तब्बल 36 वर्षांचा कालावधी लागला. आता कंपनीने येत्या 4 वर्षांमध्ये 5 हजार कोटींचा महसूल उत्पन्न करण्याचा कंपनीचा मानस आहे, असे सेंच्युरी प्लायबोर्डचे कार्यकारी संचालक केशव भजंका यांनी नुकतेच कोलकाता येथे कंपनीचा आर्थिक उळाढालीचा अहवाल सादर करताना माध्यमांना सांगितले.
आंध्रप्रदेशमध्ये नवा मॅन्युफॅक्चरींग प्लांट (New manufacturing plant in Andhra Pradesh)
1982 साली कोलकाता येथे सज्जन भजंका आणि संजय अग्रवाल यांनी सेंच्युरी प्लायबोर्डची स्थापना केली. एकूण वुड फर्निचर इंडस्ट्रीमध्ये या कंपनीचा 25 टक्के वाटा आहे. या कंपनीने पहिल्यांदा 1987 मध्ये कीड न लागणारा असा पहिला प्लाय निर्माण केला होता. तेव्हापासून ही कंपनी स्वत:च्या ब्रँडसाठी आणि इतरांसाठी प्लाय संबंधित उत्पादने बनवतात. प्लायवुड, लिमॅनेशन प्लाय, पार्टीकल बोर्ड, लाकडी पॅनल, फायबरबोर्ड ही यांची महत्त्वाची उत्पादने आहेत. तर मध्यम जाडीचे फायबरबोर्ड बनवण्यात आघाडीवर आहेत. सध्या ही उत्पादने पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, आसाम, गुजरात आणि तामिळनाडू येथील कारखान्यांमध्ये बनत आहेत. आता आंध्रप्रदेशमध्ये 700 कोटींचे मॅन्युफॅक्चरींग युनिट उभारले जात आहे. यामुळे भविष्यात उत्पादनात मोठी उंची गाठू, असा विश्वास भजंका यांनी व्यक्त केला.
2022 वर्षात मिळवलेले यश (Achievement of the year 2022)
सेंच्युरी प्लायबोर्डने यावर्षी विविध उत्पादकांसाठी, त्यांच्या गुणवत्ता आणि उत्पादन संख्या वाढवण्यासाठी तसेच आंध्रप्रदेशच्या प्लांटसाठी मिळून एकूण 1 हजार 500 कोटींची गुंतवणूक केली आहे. कंपनीमध्ये यावर्षी 3 हजार 50 कोटींची उलाढाल झाली. उलाढाल अर्थात टर्नओव्हर, म्हणजे सेंच्युरी प्लायबोर्डने 3 हजार 50 कोटींच्या मालाची विक्री केला. 3 हजार कोटी हा आकडा गाठण्यासाठी कंपनीने 36 वर्षे मेहनत घेतली. या विक्रतून कंपनीला 313.15 कोटींचा नफा झाला आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच कंपनीने 61.55 कोटींचा नफा कमावला होता, ही माहिती कंपनीच्या 2022 वर्षाच्या आर्थिक अहवालात नमूद आहे.
2022 वर्षामध्ये सर्वाधिक ऑर्डर या रिटेलमधून आल्या. थेट रिअल इस्टेट कंपन्यांकडून येणाऱ्या बल्क ऑर्डर संख्या कमी झाली आहे, असे भजंका यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले. तसेच येत्या चार वर्षांत 5 हजार कोटींची विक्री करण्याचे लक्ष्य समोर ठेवून कंपनी कामाला सुरुवात करत आहे, असेही भजंका म्हणाले.