Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Central Government Scheme: प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये आता होणार फवारणीसाठी ड्रोनची विक्री, जनऔषधी केंद्रही उघडणार

Central Government Scheme

Image Source : www.krishijagran.com

PMKSK: केंद्र सरकार देशभरातील 1,00,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून पिकांसाठी लागणारे खते आणि कीटकनाशकांची विक्री सुरू करणार आहे, त्यांच्या फवारणीसाठी ड्रोनची विक्री देखील सुरू करणार आहे. तसेच केंद्र सरकारने जन औषधी केंद्र उघडण्याची घोषणाही केली आहे.

Central Government Scheme For PMKSK: केंद्र सरकार देशभरातील  1,00,000  प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून पिकांसाठी लागणारे खते आणि कीटकनाशकांची विक्री सुरू करणार आहे. तसेच त्यांच्या फवारणीसाठी ड्रोनची विक्री देखील सुरू करणार आहे. यासाठी सक्रिय नसलेले पीएसी शोधले जातील आणि त्यांना किरकोळ ड्रोन विक्रेते म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या कक्षेत आणले जाईल. केंद्र सरकारने 2000  प्राथमिक कृषी पतसंस्थांवर (Primary Agricultural Credit Societies) जन औषधी केंद्र उघडण्याची घोषणाही केली आहे.

मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

निष्क्रिय पीएसीच्या योग्य वापरावर भर देण्यासाठी  7 जून रोजी नवी दिल्ली येथे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रसायने व खते मंत्री मनसुख एस मांडविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पीएसी म्हणजेच कृषी समित्यांबाबत अनेक निर्णय घेण्यात आले. याचवेळी हे पॅक (Pradhan Mantri Kisan Samruddhi Kendras) प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या कक्षेत आणले जाणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

प्राथमिक कृषी पतसंस्थेला स्थान

पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र (PMKSK) च्या कक्षेत प्राथमिक कृषी पतसंस्थेला किरकोळ ड्रोन विक्रेता म्हणून प्रोत्साहन दिले जाईल. तर,निष्क्रिय प्राथमिक कृषी पतसंस्था विकासाअंतर्गत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. ड्रोन विक्रीव्यतिरिक्त हे पॅक सेंद्रिय खते, आंबवलेले खत इत्यादींच्या विपणन आणि विक्रीशी (Marketing and Sales) देखील जोडले जातील.

2000 पॅकवर जनऔषधी केंद्रे

तर 1 लाख प्राथमिक कृषी पतसंस्थापैकी, 2000 प्राथमिक कृषी पतसंस्था शोधून तेथे जनऔषधी केंद्रे उघडून लोकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून दिली जातील,असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऑगस्ट 2023 पर्यंत 1000 जन औषधी केंद्रे आणि डिसेंबर 2023 पर्यंत 1000 केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.

रोजगाराच्या संधी निर्माण होतील

PACS संदर्भात घेतलेल्या निर्णयांमुळे PACS सक्रिय होईल,ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ग्रामीण भागातील शेतकरी आणि स्थानिक लोक खते, बियाणे, सेंद्रिय खते, फवारणीसाठी ड्रोन आणि उपचारासाठी औषधे प्राथमिक कृषी पतसंस्थांवर कमी किमतीत खरेदी करू शकतील, अशी माहिती सहकार मंत्रालयाने दिली.