आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन समूहातील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सोमवारी 26 डिसेंबर 2022 रोजी मुंबईत मोठी करवाई केली. या घोटाळ्यात व्हिडिओकॉन समूहाचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने मुंबईतून अटक केली. धूत यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. (Central Bureau of Investigation arrests Videocon chairman Venugopal Dhoot in ICICI bank fraud case )
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ असताना चंदो कोचर यांनी पदाचा गैरवापर करुन व्हिडिओकॉन समूहाला बेकायदा 3250 कोटींची कर्जे दिली होती. यात त्यांनी पती दिपक कोचर यांच्या कंपनीला अप्रत्यक्ष फायदा मिळवून दिला होता असे तपासातून निष्पन्न झाले आहे. वर्ष 2009 ते 2011 या काळात चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या सर्वच कर्जांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. वर्ष 2012 मध्ये धूत यांनी कर्जातील 64 कोटी रुपये दिपक कोचर यांच्या एनयू पॉवर रिनिवेबल्स या कंपनीत बेकायदा हस्तांतर केले होते.
बँकेतील एका जागरुक कर्मचाऱ्याने हे प्रकरण उजेडात आणले होते. सीबीआयने 2019 मध्ये चंदा कोचर, दिपक कोचर, वेणुगोपाल धूत, व्हिडिओकॉन इंटरनॅशन, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज, एनयू पॉवर रिनिवेबल्स या कंपन्याविरोधात आयपीसी आणि भ्रष्टाचार रोखण्यासंर्भातील कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. वर्ष 2017 मध्ये व्हिडिओकॉन समूहाची कर्जे बुडीत कर्जात वर्ग झाली. ज्यामुळे आयसीआयसीआय बँकेला तोटा सहन करावा लागला होता.
तिघांना 28 डिसबेंर 2022 पर्यंत सीबीआय कोठडी
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सीबीआयने चंदा कोचर आणि दिपक कोचर यांना अटक केली होती. सीबीआयनच्या विशेष न्यायलयाने कोचर दाम्पत्याला 26 डिसेंबर 2026 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. आज सोमवारी सीबीआयने मुंबईतून वेणुगोपाल धूत यांना ताब्यात घेतले. चंदा कोचर, दिपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर दुपारी एकत्र हजर करण्यात आले. या तिघांना 28 डिसेंबर 2022 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.