Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cash vs E-Voucher: रोक रक्कम की ई-वाउचर... भेट म्हणून काय द्यावे? गिफ्ट देताना ‘या’ गोष्टींचा करा विचार

Gift Vouchers

Image Source : https://unsplash.com/

भेटवस्तू म्हणून रोख रक्कम द्यावी की ई-वाउचर असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. मात्र, या दोन्ही भेटवस्तू देण्याआधी यांचे फायदे-तोटे जाणून घेणे गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. खासकरून, त्या व्यक्तीच्या आवडी-निवडीपासून ते बजेटपर्यंत अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. विशेष म्हणजे भेटवस्तूमधून व्यक्तीविषयी असलेला आदर, प्रेम देखील स्पष्ट होणे गरजेचे असते. वाढदिवस, लग्न, सणाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी, भावा-बहिणीला आपण भेटवस्तू देत असतो. अनेकदा नक्की काय भेटवस्तू द्यावी यावरून गोंधळ उडतो. स्मार्टवॉच, मोबाइल, कपड्यांपासून ते बूट असे अनेक पर्याय असतात. मात्र, या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू म्हणून रोख रक्कम किंवा ई-वाउचर देखील देऊ शकता. नक्की कोणती भेटवस्तू द्यावी हे लक्षात येत नसेल तर अशावेळी हे पर्याय चांगले ठरू शकतात. भेटवस्तू म्हणून रोख रक्कम की ई-वाउचर यापैकी नक्की काय देणे चांगले याविषयी लेखातून जाणून घेऊया.

रोख रक्कम भेट म्हणून देण्याचे फायदे-तोटे

रोख रक्कम सर्वोत्तम गिफ्ट – वाढदिवस असो की लग्न समारंभ सर्वसाधारणपणे भेटवस्तू म्हणून रोख रक्कम देण्याची पद्धत सर्वच ठिकाणी प्रचलित आहे. जेव्हा तुम्हाला कोणती वस्तू भेट म्हणून घ्यावी हे लक्षात येत नाही त्यावेळी रोख रक्कम उत्तम पर्याय आहे.

गरजेनुसार खर्च – समजा, तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीला भेट म्हणून रोख रक्कम दिली आहे. अशावेळी ती व्यक्ती तिच्या गरजेनुसार ते पैसे खर्च करू शकते. तसेच, स्वतःच्या आवडीनुसार वस्तू खरेदी करू शकते.

सर्वत्र स्विकार्य – पैसे देऊन कोणतीही भेटवस्तू सहज खरेदी करणे शक्य आहे. मात्र, त्या तुलनेत ई-वाउचरच्या मदतीने तुम्ही ठराविक ठिकाणी, ठराविक वस्तूच खरेदी करू शकता.

हरवण्याची व चुकीच्या गोष्टींसाठी वापर होण्याची शक्यता – तुम्ही भेट म्हणून रोख रक्कम चांगल्या हेतूने दिली असली तरी त्याचा चुकीच्या गोष्टीसाठी वापर होऊ शकतो व तुम्ही ज्या उद्देशाने गिफ्ट दिले तो उद्देश साध्य होणार नाही. तसेच, पैसे हरवण्याची देखील शक्यता असते.

ई-वाउचर भेट म्हणून देण्याचे फायदे-तोटे

पर्सनलाइज्ड गिफ्ट – तुम्ही ज्या व्यक्तीला भेटवस्तू देत आहात, त्यांच्या आवडीनुसार ई-वाउचरची निवड करू शकता. याशिवाय, ई-वाउचर एक खास संदेश लिहून त्यांच्या ई-मेल आयडी अथवा मोबाइलवर पाठवून त्यांना सरप्राइज देता येईल.

अविस्मरणीय भेटवस्तू – पैसे हे अविस्मरणीय भेटवस्तू ठरू शकत नाही. त्या तुलनेत तुम्ही जर एखाद्या खास हॉटेलचे, प्रवासाचे ई-वाउचर भेट म्हणून दिल्यास ही गोष्ट त्या व्यक्तीच्या कायमस्वरुपी लक्षात राहते.  त्यामुळे हे एक अविस्मरणीय गिफ्ट ठरू शकते.

वापरताना अडचणी – बऱ्याचवेळी ई-वाउचरचा वापर करताना अडचणी येऊ शकतात. कारण, ई-वाउचर हे ठराविक स्टोर व वेबसाइटसाठीच उपलब्ध असते. त्या तुलनेत रोख रक्कमेद्वारे ती व्यक्ती स्वतःच्या आवडीची कोणतीही भेटवस्तू खरेदी करू शकते.

मुदत – प्रत्येक ई-वाउचरची ठराविक एक्सायरी डेट असते. याचाच अर्थ ती मुदत संपल्यावर वाउचरचा वापर करणे शक्य होत नाही. याउलट पैशांचा वापर कधीही व कोठेही करणे शक्य होतो.

Cash vs E-Voucher: नक्की काय द्यावे?

एकूणच, रोख रक्कम की ई-वाउचर यापैकी काय भेट म्हणून द्यावे हे ज्या व्यक्तीला गिफ्ट देत आहात त्याच्या आवडी-निवडी, व्यक्तीमत्त्व व गरज यावरून ठरत असते. त्यामुळे यापैकी भेटवस्तू देताना या सर्व गोष्टींचा विचार करा, तुमचे बजेट ठरवा व त्यानुसार निर्णय घ्या.