Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deactivate FASTag : जुनी कार विकण्यापूर्वी FASTag निष्क्रिय करायला विसरु नका

Deactivate FASTag

Car Fastag Account Deactivation : जर तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करीत असाल तर, त्याआधी तुम्हाला तुमच्या कारशी संबंधित काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये फास्टॅग खाते निष्क्रिय करणे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे.

Old Car Must Deactivate Fastag Before Sale : कारने कुठेही जातांना टोल लेन सहज पार करण्यास तुम्हाला फास्टॅग ने अनेकदा मदत केलेली आहे. गर्व्हमेंटने  FASTag सुविधा अंमलात आणल्यापासून टोल भरण्याचा कालावधी बराच कमी झाला आहे. आता जर तुम्ही तुमची कार दुसऱ्याला विकण्याचा विचार करीत असाल तर, कार विकण्याआधी तुम्हाला तुमची फास्टॅग प्रणाली निष्क्रिय (Deactivate) करावी लागणार आहे. अन्यथा याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. तेव्हा फास्टॅग प्रणाली निष्क्रिय केल्यावरच कार विकण्याचा निर्णय घ्या.

कसा कापला जातो टोल? 

टोल-प्लाझावर उपस्थित असलेले FASTag वाचक बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोल शुल्क आपोआप कापले जाते. अशावेळी वेळ न गमावता, तुम्ही तुमच्या कारने FASTag लेन पार करता. आता तुम्ही तुमची तीच कार विकणार असाल किंवा तुमच्या वाहनाची मालकी दुसऱ्याकडे हस्तांतरित करणार असाल तर त्या वाहनाचे FASTag खाते निष्क्रिय करणे फार महत्वाचे ठरते.

फास्टॅग निष्क्रिय करणे गरजेचे का?

प्रत्येक FASTag पेमेंट हा तुमच्या बँकेतील खात्याशी जोडलेला असतो. जर तुम्ही कारची विक्री करताना किंवा कारची मालकी दुसऱ्या व्यक्तिला हस्तांतरित करताना FASTag खाते निष्क्रिय केले नाही, तर कार खरेदी करणारा व्यक्ती टोल शुल्क भरण्यासाठी तुमचे FASTag खाते वापरू शकतो आणि अशा प्रसंगी तुमच्या पेमेंट खात्यातून शुल्क कापले जाईल. तसेच, FASTag ला फक्त एकच वाहन जोडता येते. अशावेळी, जोपर्यंत तुम्ही फास्टॅग निष्क्रिय करत नाही, तोपर्यंत कार खरेदी करणारा व्यक्तीला सेकंड हँड कारसाठी नवीन फास्टॅग जारी केला जाणार नाही. आणि जर का पूढे तुम्ही तुमच्यासाठी नवीन कार घेतली तर, त्यावेळी घेण्यात आलेल्या FASTag ला परत तुम्ही तुमचे पुर्वीचे बँक खाते जोडू शकता.

फास्टॅग खाते निष्क्रिय करण्याची पध्दती

सगळ्यात आधी तुम्ही FASTag प्रदाता ग्राहक सेवाशी (FASTag Provider Customer Service) संपर्क करा. यावेळी FASTag शी लिंक केलेले खाते बंद किंवा निष्क्रिय करण्याची विनंती केल्यास ते Deactivate केले जाते. तसेच केंद्र सरकारच्या NHAI द्वारे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन १०३३ वर कॉल करून तुम्ही फास्टॅग बंद करण्यास तक्रार देखील नोंदवू शकता.

  1. पेटीएम यूजर्स १८००१२०४२१० वर कॉल करून त्यांचे FASTag खाते बंद करण्यासंबंधी माहिती मिळवू शकतात.
  2. ICICI बँक यूजर्स १८००२१००१०४ वर कॉल करून FASTag निष्क्रिय करण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्व माहिती मिळवू शकतात.
  3. एअरटेल पेमेंट्स बँकचे यूजर्स खाते निष्क्रिय करण्यासाठी ८८००६८८००६ वर कॉल करून FASTag बंद करण्यासंबंधी माहिती मिळवू शकतात.
  4. अॅक्सिस बँकेचे यूजर्स त्यांचे FASTag खाते निष्क्रिय करण्यासाठी १८००४१९८५८५ वर कॉल करू शकतात.
  5. HDFC बँकेचे यूजर्स 18001201243 वर संपर्क करून FASTag बंद करण्यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकतात.
  6. NHAI (IHMCL) सेवा यूजर्स 1033 वर कॉल करून FASTag संबंधित सर्व तक्रारींची माहिती देखील मिळवू शकतात.