Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MCLR Rate Increase: बँक ऑफ बडोदासह कॅनडा बँकेने केली MCLR दरात वाढ, ग्राहकांना मोठा धक्का

MCLR Rate Increase

Bank of Baroda Increase MCLR Rate: एकीकडे अनेक बँकांनी आपले कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदा आणि कॅनडा बँकेने निवडक कालावधीसाठी कर्ज व्याजदरात वाढ केली आहे. दोन्ही बँकांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केल्याने ग्राहक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Canara Bank Increase MCLR Rate: बँक ऑफ बडोदा आणि कॅनडा बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण, दोन्ही बँकांनी निवडक कालावधीसाठी कर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत. दोन्ही बँकांनी MCLR दर रिवाइज केले आहेत. अशावेळी बँकेच्या कर्ज धारकांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. तर नवीन ग्राहकांना महागड्या दराने कर्ज घ्यावे लागणार आहे.

MCLR दर म्हणजे काय?

MCLR (Marginal Cost Lending Rate) हा मूलभूत किमान दर आहे, ज्याच्या आधारावर बँका ग्राहकांना कर्ज देतात. याला कर्ज दराची मर्यादित किंमत (Marginal Cost of Borrowing Rate) असेही म्हणतात. MCLR ची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे 2016 मध्ये विविध प्रकारच्या कर्जांचे व्याज दर निश्चित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. वाजवी आणि खुल्या व्याजदराने कर्ज देताना बँकांनी वापरण्यासाठी ते बेंचमार्क दर म्हणून कार्य करते. बँकेने MCLR मध्ये कोणताही बदल केल्यास कर्जाच्या किमतीवर म्हणजेच व्याजदरावरही परिणाम होतो.

बँक ऑफ बडोदा  MCLR दर

बँक ऑफ बडोदाच्या MCLR ने निधी आधारित कर्ज दर (Fund Based Loan Rates) रिवाइज केले आहेत. बँकेने एका वर्षाच्या कार्यकाळासाठी 5 बेसिस पॉइंट्सने दर वाढवला आहे. तर, इतर कार्यकाळावरील MCLR दरात कुठलाही बदल केलेला नाही.  बँकेने 12 जून 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. बँक ऑफ बडोदाने कमीत कमी कालावधीसाठी MCLR 7.95 % केला आहे. तर एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी बँकांचा MCLR अनुक्रमे 8.20 %, 8.30 % आणि 8.40 % आहे. बँक ऑफ बडोदा बँकेचा MCLR एक वर्षाच्या कार्यकाळात 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

कॅनडा बँक कर्जाचा व्याजदर

कॅनडा बँकेने निधी आधारित MCLR दरात कुठलाही बदल केलेला नाही. कॅनडा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी MCLR दर आता 7.90 % आहे. तर एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचे MCLR दर अनुक्रमे 8.00 %, 8.15 %  आणि 8.45 %  आहेत. एका वर्षाच्या कार्यकाळावर बँकेचा MCLR 8.65 टक्के आहे. कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर फक्त 12 जून 2023 रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या नवीन खात्यांना लागू होतील आणि 12 जून 2023 रोजी किंवा त्यानंतर RLLR अंतर्गत 3 वर्षे पूर्ण करणार्‍या खात्यांना लागू होतील.

तर, बँक ऑफ इंडिया  (BOI), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) बँकेने एप्रिलमध्ये MCLR (Marginal Cost of Funds based Lending Rate) दर 0.85 टक्क्यांनी कमी केला होता. परंतु, एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) परत जून महिन्यात 15 बेस  पॉईंट्सनी (MCLR) दर वाढविले.