Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Podcast मधून पैसे कमवता येतात का ? जाणून घ्या डिटेल्स

money from podcasts

पॉडकास्ट सुरू करणे आणि त्यातू कमाई करणे हा सध्याच्या काळात बिजनेसचा चांगला पर्याय ठरू शकतो. होय आवड आणि कमाई हे एकाच ठिकाणी करायची सोय या व्यवसायात तुम्हांला मिळू शकेल. यात कंटेट निर्मितीपासून कमाई करण्याच्या धोरणापर्यंत अनेक पायऱ्यांचा समावेश होतो. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

सध्या तरुणाईत पॉडकास्टची क्रेझ आहे. आपलं दैनंदिन काम करता करता, प्रवासात, शतपावली करताना अनेकांना Podcast ऐकायला आवडतं. आता जिथे मागणी आहे तिथे पुरवठा हा आलाच. सोबतच जिथे पुरवठा आहे तिथे साधनांची निर्मिती आली आणि त्यातून मार्केट हे आलंच. या लेखात आपण पॉडकास्टच मार्केट कसं काम करत आणी त्यातून कसे पैसे कमावता येतात याबद्दल आपण जाणून घेऊयात.

पॉडकास्ट सुरू करणे आणि त्यातू कमाई करणे हा सध्याच्या काळात बिजनेसचा चांगला पर्याय ठरू शकतो. होय आवड आणि कमाई हे एकाच ठिकाणी करायची सोय या व्यवसायात तुम्हांला मिळू शकेल. यात कंटेट निर्मितीपासून कमाई करण्याच्या धोरणापर्यंत अनेक पायऱ्यांचा समावेश होतो. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

विषयाची निवड 

एखाद्या विशिष्ट विषयावर तुम्ही पॉडकास्ट बनवू शकता  ज्यामध्ये तुम्हाला स्वारस्य आहे आणि प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना देखील ते आवडेल. एकदा एकी तुम्हाला याची कल्पना आली की तुम्ही सहज तुमचे फॉलोअर्स लक्षात घेऊन तुमच्या पॉडकास्टचा विषय निवडू शकता.

तुमचा पॉडकास्ट किती भागांमध्ये असेल, त्यामागची आयडिया काय असेल, त्याचे स्वरूप आणि संभाव्य गेस्ट यांची आधी ढोबळ लिस्ट काढून ठेवा. तुमचे कंटेट इतरांपेक्षा वेगळे आणि उत्तम गुणवत्तेचे असायला हवे याची काळजी घ्या.

रेकॉर्डिंग सेटअप

चांगल्या दर्जाचा मायक्रोफोन, हेडफोन आणि रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरमध्ये गुंतवणूक करा. ही गुंतवणूक सुरुवातीला महाग वाटत असली तरी तुमच्या व्यवसायाचे हे भांडवल आहे हे लक्षात ठेवा. सध्या ऑनलाइन मार्केटप्लेसवर तुम्ही स्वस्तात या सर्व गोष्टी खरेदी करू शकता. स्पष्ट ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी शांत जागेचा पर्याय निवडा.

रेकॉर्डिंग आणि एडिटिंग

तुमचे एपिसोड रेकॉर्ड केल्यानंतर त्यातील अनावश्यक सेगमेंट्स एडिट करा आणि इंट्रो/आउट्रोसाठी म्युझिक वापरा. कॉपीराईट फ्री म्युजिकचा वापर करा, जे तुम्हाला मोफत वापरता येतील आणि त्यामुळे काही अडचणी देखील वाढणार नाहीत. Audacity किंवा Adobe Audition सारखे सॉफ्टवेअर पर्यायाने कमी किमतीत उपलब्ध आहेत, त्यांचा एडिटिंगसाठी वापर करा.

होस्टिंग प्लॅटफॉर्म

तुमचे भाग प्रकाशित करण्यासाठी पॉडकास्ट होस्टिंग प्लॅटफॉर्म निवडा. अँकर, लिबसिन आणि पॉडबीन हे काही लोकप्रिय पर्याय सध्या उपलब्ध आहेत. हे प्लॅटफॉर्म तुमचे पॉडकास्ट विविध पॉडकास्ट डिरेक्टरीमध्ये वितरित करतात. तुम्हांला ग्राहकवर्ग मिळवण्यासाठी याचा उपयोग करता येईल.

तुमच्या पॉडकास्टला आकर्षक कव्हर आर्ट डिझाइन करा आणि तुमच्या पॉडकास्टसाठी ब्रँडिंग तयार करा. लक्षात ठेवा फर्स्ट इंप्रेशन महत्त्वाचे असते.

पॉडकास्ट वितरण

तुमचे पॉडकास्ट Apple Podcasts, Spotify, Google Podcasts आणि इतर सारख्या प्रमुख  डिरेक्टरीमध्ये वितरित करा. यामुळे तुमची पोहोच वाढायला मदत मिळेल. तुमच्या पॉडकास्टचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया, तुमचे पर्सनल नेटवर्क जरूर वापरा.

कमाई कशी कराल?

तुमचे युजर्स वाढल्यानंतर, तुम्ही प्रायोजित भाग किंवा जाहिरातींसाठी तुमच्या आवडीनुसार कुठल्याही ब्रँडसोबत भागीदारी करू शकता. सोबतच क्राऊडफंडिंगचा पर्याय देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे. पॅट्रिऑन सारखे प्लॅटफॉर्म श्रोत्यांना चांगल्यात चांगली माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत करू देतात. असे अनेक युट्युबर आणि पॉडकास्टर आहेत जे पॅट्रिऑनच्या माध्यमातून पैसे कमावतात.

काही प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन-आधारित कंटेट ऑफर करतात जेथे श्रोते प्रीमियम भागांसाठी शुल्क देतात, पॉडकास्टच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा हा एक प्रचलित प्रकार आहे. एवढेच नाही तर वेगवेगळे इव्हेंट्स आणि वर्कशॉप्स आयोजित करून तुम्ही तुमच्या पॉडकास्टशी संबंधित विषयावर कार्यक्रम, कार्यशाळा किंवा वेबिनार आयोजित करू शकता आणि उपस्थितांकडून शुल्क आकारु शकता.

लक्षात ठेवा, पॉडकास्टिंग हा काही एका रात्रीत नावारूपाला येणारा बिजनेस नाही. यासाठी तुमचे दीर्घकालीन प्रयत्न आवश्यक आहेत. यात यश मिळण्यास वेळ लागू शकतो हे कायम ध्यानात ठेवा, सातत्य जर असेल आणि कल्पकता जर असेल तर अल्पावधीत तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.