Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TV Channel Tariff Hike: केबल आणि DTH च्या शुल्कात वाढ, मनोरंजन देखील महागले!

TRAI

Telecom Regulatory Authority of India: टीव्ही पाहणं झालं महाग! DTH आणि केबलवर 10-15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली असून, केबल चालक आणि ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.देशभरात OTT चॅनेल वाढल्यानंतर केबल ऑपरेटर्सचे ग्राहक आधीच कमी झाले आहेत. त्यात शुल्कवाढ केल्यास आहे ते ग्राहक सेवा घेणे बंद करतील अशी भीती ऑपरेटर्स व्यक्त करत आहेत.

ओटीटी चॅनल्स वाढल्यानंतर केबल ऑपरेटर्सचे ग्राहक आधीच कमी झाल्याची भीती ऑपरेटर्स व्यक्त करत आहेत. ट्रायच्या ताज्या टॅरिफ ऑर्डरमुळे ग्राहकांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

मनोरंजनाचे स्वस्त साधन असलेले टीव्ही पाहणे महाग झाले आहे. TRAI ने टीव्ही चॅनेल्सच्या किंमतीबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर जारी केली आहे. हा आदेश सर्व केबल ऑपरेटर आणि डीटीएचवर 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे. ट्रायच्या नव्या आदेशानंतर डीटीएच आणि केबलचे बिल 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे. त्यानुसार काही समूहांनी नव्या दरवाढीबाबतच्या नियम-अटींचा समावेश असलेले Reference Interconnect Offer (RIO) केबल व DTH सेवा पुरवठादारांना पाठवले आहे. यानुसार नव्याने केबलदरात शुल्कवाढ केली जावी अशी सूचना करण्यात आली आहे. परंतु काही केबल व डीटीएच सेवा पुरवठादारांनी शुल्कवाढ करण्यास विरोध दर्शविला आहे. मागणी मान्य न झाल्यामुळे 'सोनी', 'स्टार' आणि 'झी' सारख्या वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबविण्यात आले आहे.

देशभरात OTT चॅनेल वाढल्यानंतर केबल ऑपरेटर्सचे ग्राहक आधीच कमी झाले आहेत. त्यात शुल्कवाढ केल्यास आहे ते ग्राहक सेवा घेणे बंद करतील अशी भीती ऑपरेटर्स व्यक्त करत आहेत. ट्रायच्या ताज्या टॅरिफ ऑर्डरमुळे ग्राहकांची संख्या आणखी कमी होऊ शकते, असे जाणकारांनी म्हटले आहे.नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

सिंगल चॅनलपासून पॅकेज चॅनेलपर्यंतच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा संपूर्ण भार ग्राहकांवर पडत आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांचे 10 ते 15 टक्क्यांनी भाव वाढले आहेत. यापूर्वी ग्राहकांना 250 रुपयांमध्ये सर्व चॅनेल बघता येत होते. परंतु, आता सुमारे 350 रुपये भरूनही अनेक वाहिन्या ग्राहकांना दाखवल्या जात नाहीये. शुल्कवाढ संबंधी केबल आणि DTH पुरवठादारांना पाठविण्यात आलेल्या RIO नोटिशीवर 48 तासांच्या मुदतीत स्वाक्षरी करा अन्यथा वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले जाईल असा इशारा ब्रॉडकास्टर्सकडून दिला गेला होता. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केबल व DTH पुरवठादारांनी शुल्कवाढ करण्यास मनाई केली आणि हाथवे, डेन, जीटीपीएल, इन मुंबई या कंपन्यांना नोटीस बजावली आहे. यामुळे झी, सोनी आणि स्टारने आपल्या वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर पडला आहे. कुठलीही कल्पना न देता प्रक्षेपण बंद केल्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे.