चीनमधील आघाडीची BYD ही इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी निम्मी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन आखत आहे. कंपनी भारतामध्ये येत्या काळात अनेक गाड्या लाँच करणार असून डिलरशिपचे नेटवर्कही उभारत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीमध्ये चीनी बीवायडी ही कंपनी जगात प्रथम क्रमांकावर आहे. चिनी मोबाईल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर कब्जा मिळवल्यानंतर आता वाहन क्षेत्रात चीन किती मजल मारेल हे येत्या काळात करेल.
वॉरेन बफेट यांची BYD कंपनीत आहे गुंतवणूक
बीवायडी या कंपनीमध्ये प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअरमार्केट गुरू वॉरेन बफेट यांची गुंतवणूक आहे. या वर्षाच्या शेवटी कंपनी भारतामध्ये प्रवासी इलेक्ट्रिक गाडी लाँच करणार आहे. तसेच डिलरशीप नेटवर्क डबल करणार आहे. बीवायडी कंपनीने दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये सहभाग घेतला असून इलेक्ट्रिक गाड्या सादर केल्या.
www.cleantechnica.com
एक वर्षाच्या आत भारतात २४ शोरुम्स
बीवायडी इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनीने भारतामध्ये मागील एक वर्षाच्या काळात 24 शोरुम्स सुरू केले आहेत. 21 शहरांमध्ये हे शोरुम सुरू करण्यात आले आहे. बीवायडी कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतात पहिली कार लाँच केली. या वर्षी भारतामध्ये Atto 3 e-SUV मॉडेलच्या 15 हजार गाड्या विक्री करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. येत्या काळात कंपनी भारतामध्ये निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.
2030 पर्यंत 40 मार्केट काबीज करण्याचा निर्धार
www.drive.com.
BYD कंपनीने भारतामध्ये 2030 पर्यंत 40% मार्केट काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे कंपनीचे उपाध्यक्ष संजय गोपालकृष्णण यांनी सांगितले. आम्ही आक्रमकपणे भारतीय बाजारात उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले. चिनी कंपन्याना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारी पातळीवरुन कठोर नियमावलीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांना भारतामध्ये येण्यात अडचणी येत आहेत.