आजच्या सत्रात मार्केटमध्ये चौफेर खरेदी झाल्याने सर्व सेक्टरचे निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. म्हणजेच त्यांच्या वाढ झाली. कॅपिटल गुड्स, आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी उभारी दिसून आली. या दोन्ही निर्देशांकामध्ये आज 2 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्समध्येही 433 अंकांची वाढ झाली तर निफ्टी 50 15,830 अंकावर बंद झाला. मार्केटमधील मिडकॅप आणि स्मॉल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर आयटी आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वांत जास्त खरेदी झाली. खालील कंपन्यांमध्ये आज सर्वाधिक हालचाल दिसून आली
बजाज ऑटो (Bajaj Auto)
CMP : Rs. 3862.05
बजाज ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये आज 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. कंपनीच्या संचालक मंडळानी आज खुल्या बाजारात 2500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकला मंजूरी दिली. शेअर बायबॅकची अधिकतम किंमत 4600 रूपये असणार आहे.
डिश टीव्ही इंडिया (Dish TV India)
CMP : Rs. 12.46
डिश टीव्हीच्या शेअर्समध्ये आज 3 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान कंपनीने आज जवाहर लाल गोयल हे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर पद सोडणार असून ते कंपनी बोर्डामध्ये नॉन-एक्झिक्युटीव्ही डायरेक्टर म्हणून राहतील, अशी माहिती दिली.
वेदांता (Vedanta)
CMP : Rs. 227.85
वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कंपनी सध्या आतापर्यंतचा सर्वांत मोठा रूपी बॉण्ड आणण्याच्या तयारीत आहे. याची इश्यू प्राईस 10 रूपये असून व्हॉल्यूम 4,809 कोटी रूपये असणार आहे. कंपनी यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणि कॅपिटल वाढवण्यासाठी करणार आहे.
इंडियन कार्ड क्लोथिंग (Indian Card Clothing)
CMP : Rs. 272
इंडियन कार्ड क्लोथिंगच्या शेअर्समध्ये आज 8 टक्क्यांची उसळण दिसून आली. कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअरमागे 25 रूपयांचा विशेष अंतरिम डिव्हिडंट जाहीर केला आहे.
फेडरल बॅंक (Federal Bank)
CMP : Rs. 90.90
फेडरल बॅंकेच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. बॅंकेच्या 30 जूनला होणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये राईट इश्यू, प्रायव्हेट प्लेसमेंट, प्रिफेंशियल इश्यू, एफपीओ, क्यूआयपी यासारख्या पर्यायांद्वारे फंड मिळवण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे.
डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories)
CMP : Rs. 4,317.15
डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजच्या शेअर्समध्ये थोडीशी वाढ होऊन बंद झाला. कंपनीने इटॉन फार्मा कंपनीकडून एक इंजेक्टेबल प्रोडक्टचा पोर्टफोलिओ मिळवला आहे. या बातमीमुळे डॉ. रेड्डीच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती.