How to know about Purity of Gold: भारत हा जगातील सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे सोन्यात गुंतवणूक ही मोठी गुंतणूक मानली जाते. म्हणूनच सोने खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी सोने खरे आहे की खोटे...त्याची शुध्दता कशी चेक करावी हे खालीलप्रमाणे जाणून घेवुयात.
Table of contents [Show]
सोन्यावर हॉलमार्क आहे का? हे चेक करावे
बीआयएस (Bureau of Indian Standards) म्हणजेच भारतीय मानक ब्युरो. जे भारतीय शासनाच्या अधिपत्याखाली काम करते. खऱ्या सोन्यावर बीआयएसचे तिकोनी निशानी म्हणजेच हॉलमार्कचे चिन्ह असते. यामुळे सोन्याची क्वालिटी व ते किती शुध्द आहे हे कळण्यास मदत होते.
चुंबकाचा वापर करून ही खरे सोने ओळखू शकता
सोने खरेदी करायला जात असाल, तर सोबत चुंबक घेऊन जावे. चुंबकामुळे सोने खरे आहे की खोटे हे त्वरित लक्षात येते. कारण शुध्द सोने हे चुंबकाला अजिबात चिकटत नाही. समजा, सोने हे चुंबकाकडे आकर्षित होत असेल, तर वेळीच सावधान व्हा. सोन्यात भेसळ असल्याने सोने हे चुंबकाला चिकटले जाते. त्यामुळे आपली होणारी फसवणूक टाळता येईल.
पाण्याच्या माध्यमातूनदेखील खऱ्या सोन्याची पारख होते
खरे सोने ओळखण्यासाठी सर्वात सहज व सोपा घरगुती उपाय म्हणजे पाणी. पाण्याव्दारे शुद्ध सोन्याची पारख करता येते. एका भांडयात पाणी घ्या. त्या पाण्यात सोने टाका. समजा, सोने तरंगत असेल, तर ते नकली आहे. कारण सोने हे कधीही पाण्यात तरंगत नाही.
आपले दात ही खरे सोने ओळखू शकता
हो, खऱं आहे आपले दात ही खरे सोने ओळखण्याचे काम करू शकतात. सोने शुध्द आहे का पाहण्यासाठी ते दाताखाली दाबायचे. ते मऊ असल्याने त्यावर दाताचे निशाण दिसल्यास समजायचे की हे खरे सोने आहे. सोन्यात भेसळ असेल, तर त्यावर तुम्हाला दाताचे निशाण दिसणार नाही. त्यामुळे वेळीच सावधान व्हा.
आम्ल (Acid) टेस्टने ही खऱ्या सोन्याची करा खात्री
अस्सल सोने ओळखण्यासाठी आम्ल टेस्टचा ही उपयोग करू शकता. यासाठी एखादया पिनने सोन्यावर ओरखडा ओढा. त्यानंतर त्यावर नायट्रिक आम्लचा एक थेंब टाका. जर ते खोटे असेल तर त्यावर हिरवा रंग दिसेल. जर ते शुध्द असेल, तर त्याचा सोन्यावर काहीही परिणाम होणार नाही.
अशा पध्दतीने शुध्द सोने ओळखण्यासाठी या साध्या व सोप्या नियमांचा वापर करा. सोने खरेदी करताना यानुसार वेळीच सावधान व्हा व बिनधास्त सोने खरेदी करा आणि फसवणूक टाळा.