Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सॅमसंगचा फोन खरेदी करताय? तुम्हाला सॅमसंगच्या A आणि M सिरीजबद्दल माहित आहे का?

सॅमसंगचा फोन खरेदी करताय? तुम्हाला सॅमसंगच्या A आणि M सिरीजबद्दल माहित आहे का?

सॅमसंगचा फोन (Samsung Phone) खरेदी करताना कोणत्या सिरीजचं मॉडेल विकत घ्यायला हवं? सॅमसंगच्या वेगवेगळ्या सिरीजचा अर्थ काय आणि त्या मॉडेल्समध्ये काय फरक असतो? याची माहिती घेणार आहोत.

सॅमसंग (Samsung) हा जगातील प्रसिद्ध असा स्मार्टफोन आणि टॅबलेट ब्रॅण्ड आहे. या कंपनीचे डझनहून अधिक मॉडेल्स आहेत. या मॉडेल्सद्वारे कंपनी मार्केटमधील प्रत्येक लेटेस्ट नीश (Latest Niche Technology) पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ‘प्रत्येक सेंगमेंटवर आधारित मॉडेल’ (A Smartphone model for every Segment), कंपनीच्या या स्ट्रॅटेजीमुळे सॅमसंग सध्या जगभरात डॉमिनंट कंपनी म्हणून उदयास येत आहे. पण यामुळे स्मार्टफोन विकत घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांमध्ये गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. 

भारतात साधारणपणे सर्वजण स्मार्टफोन (Smartphone) वापरतात. पण आपली स्मार्टफोनची गरज काय? याचा अधिक विचार न करता सरसकट फोन विकत घेतला जातो. परिणामी नामांकित कंपन्यांद्वारे बाजारात येणाऱ्या स्मार्टफोनमुळे त्यांचा अधिकच गोंधळ उडतो.  संभाव्य खरेदीदार जे सॅमसंगचे प्रोडक्ट (Samsung Prodeuct) घेण्यासाठी उत्सुक आहेत; अशा ग्राहकांसाठी कोणत्या सिरीजचं कोणतं मॉडेल विकत घ्यायला हवं, याबाबत कन्फ्युशन होऊ शकतं. यासाठी आम्ही तुमच्यासाठी सॅमसंगच्या वेगवेगळ्या सिरीजचा अर्थ काय आणि कंपनी असे मॉडेल्स का तयार करते, याची माहिती घेणार आहोत.

सॅमसंगचे स्मार्टफोन आणि टॅबलेट मॉडेल (Samsung Smartphone & Tablet Model) हे वेगवेगळ्या सिरिज अंतर्गत तयार केले जातात. प्रत्येक सिरिज ही मार्केटमधील गरज ओळखून तयार केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक सिरिजमधील मॉडेल्स तयार करताना ही मार्केटमधील लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उच्च दर्जापासून स्वस्तातले मॉडेल्स तयार केले जातात.

2020 या स्पेसिफिक वर्षाचे उदाहरण द्यायचे झाले तर सॅमसंग कंपनीने या वर्षात सॅमसंग गॅलक्सी (Samsung Galaxy) या सिरीज अंतर्गत सॅमसंगचे स्मार्टफोन आणि टॅबलेट आणले होते. गॅलक्सी या सिरीज अंतर्गत सॅमसंगने मार्केटमधील ट्रेंडनुसार 6 वेगवेगळ्या सिरीज आणल्या होत्या. यात गॅलक्सी नोट सिरीज, गॅलक्सी एस सिरीज, गॅलक्सी झेड सिरीज, गॅलक्सी एक्सकव्हर सिरीज, गॅलक्सी ए सिरीज आणि गॅलक्सी एम सिरीज यांचा समावेश होता. या प्रत्येक सिरीजचं वैशिष्ट्य आणि किमतीमध्ये वेगळेपण आहे. त्याबद्दल आपण अधिक समजून घेऊ.

गॅलक्सी नोट सिरीज (Galaxy Note Series)

गॅलक्सी नोट सिरीजमध्ये मोठ्या स्क्रीन असलेल्या उच्च दर्जाच्या फॅबलेटचा समावेश होता. फॅबलेट म्हणजे नियमित फोनच्या साईजपेक्षा थोडा मोठा आणि टॅबलेटपेक्षा थोडा लहान. या फबॅलेटसोबत स्टायलस दिला गेला होता. 

गॅलक्सी एस सिरीज (Galaxy S Series)

उच्च दर्जाचे स्मार्टफोन आणि टॅबलेट हे या सिरिजचं वैशिष्ट्य आहे. प्रिमीयम किमतीमध्ये प्रिमीयम परफॉर्मन्स देणारी सिरीज म्हणून हिचा उल्लेख केला जातो.

गॅलक्सी झेड सिरीज (Galaxy Z Series)

फोल्डेबल स्क्रीन, हे या सिरीजचं वैशिष्ट्य आहे. फोल्ड असलेला फोन ओपन केल्यावर त्याची मोठी स्क्रीन तयार होते. हा गॅलक्सी सिरीजमधील सर्वांत महागडा फोन आहे.

गॅलक्सी एक्सकव्हर सिरीज (Galaxy XCover Series)

डस्ट फ्री आणि वॉटरप्रूफ असलेली ही सिरीज रफ अॅण्ड टफ सिरीज म्हणून ओळखली जाते. कोणत्याही वातावरणात सूट होईल अशापद्धतीने याचं डिझाईन करण्यात आलं आहे.

गॅलक्सी ए सिरीज (Galaxy A Series)

गॅलक्सी ए सिरीजमध्ये मध्यम किमतीच्या स्मार्टफोन्स आणि टॅबलेटचा समावेश आहे.

गॅलक्सी एम सिरीज (Galaxy M Series)

गॅलक्सी एम सिरीजमधील फोन हे बजेट फोन म्हणून ओळखले जातात आणि ते फक्त ऑनलाईन विकले जातात.

सॅमसंगच्या या 6 सिरीजपैकी आपण आज फक्त ‘ए’ आणि ‘एम’ सिरीजबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. आपण या सिरीजमधील फोन्सचे डिझाईन आणि त्यातील तांत्रिक माहिती समजून घेणार आहोत. तसेच या दोन सिरीजची आपण तुलना सुद्धा पाहणार आहोत. जेणेकरून या दोन सिरीजपैकी एकाची निवड करायची असेल तर कोणती सिरीज चांगली ठरू शकते, हे आपण समजून घेणार आहोत.

सॅमसंग ए सिरीज (Galaxy A Series)

Samsung Galaxy A Series

सॅमसंगच्या ए सिरीजमध्ये, कंपनीने मध्यम श्रेणीचे आणि बजेट फोनचे मॉडेल्स आहेत. या सिरीजमध्ये कंपनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी देत नाही. ए सिरीजमध्ये कंपनी जे गरजेचे फीचर्स आहेत; ते देण्याचा प्रयत्न करते. जसे की, चांगली क्षमता असलेली बॅटरी, चांगला कॅमेरा, 2 ते 6 जीबीची रॅम आणि 16 ते 128 GB स्टोरेज. 

सॅमसंग एम सिरीज (Galaxy M Series)

Samsung Galaxy M Series

सॅमसंगच्या गॅलक्सी एम सिरीजमधले फोन हे बजेट असून ते फक्त ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सुरूवातील कंपनीने या सिरीजमधील फोन फक्त भारतात विक्रीसाठी ठेवले होते. या सिरीजमधील फोनची किंमत सॅमसंगच्या इतर फोनच्या तुलनेत स्वस्त असतात. गॅलक्सी M01 Core हा या सिरीजमधला सर्वांत स्वस्त फोन आहे. याची स्क्रीन 5.3 इंच, 1 जीबी रॅम, 16 जीबी स्टोरेज, 3 हजार क्षमतेची बॅटरी ही त्याचे फीचर्स आहेत आणि याची भारतात साधारण किंमत 5,500 रूपयांच्या रेंजमध्ये आहे.

ए आणि एम सिरीजमध्ये काय फरक आहे? (Difference between A & M Series)

सॅमसंगच्या ए आणि एम सिरीजमधील महत्त्वाचा फरक म्हणजे, त्यांचे टार्गेट रिजन. ए सिरीजमधील फोन विशेषकरून अमेरिकेमध्ये आणि जगातील काही महत्त्वाच्या देशांमध्ये विकले जातात. या सिरीजमधील फोन हे युएस नेटवर्कला पूर्णपणे सपोर्ट करतात. म्हणजे भारतात विकत घेतलेला ए सिरीजचा फोन अमेरिकतही व्यवस्थित चालतो. तर दुसरीकडे एम सिरीजमधील फोन हे खासकरून भारतीय मार्केटसाठी लॉण्च केले जातात. अमेरिकेतही एम सिरीजचे फोन मिळतात पण ते थर्ड पार्टीकडून घेतले जातात आणि ते अमेरिकेत वापरण्यापूर्वी अनलॉक करून घ्यावे लागतात. तसेच तिथल्या सर्व नेटवर्कला सपोर्ट करत नाहीत. 

ए आणि एम सिरीजचा तुलनात्मक तक्ता (Comparison Chart of A and M Series)

सिरीज

एमसिरीज

फोनची उपलब्धतता

संपूर्ण जगभरात

भारत

मार्केट सेगमेंट

मिडरेंज

बजेट फोन

स्पर्धेक कंपन्या

ओपो, व्हिवो, शिओमी

आयफोन SE, पिक्सेल 3A

किंमत

12 ते 50 हजार

6 ते 30 हजार

किमतीनुसार परफॉमर्न्स

गुड

साधारण

यूएस नेटवर्क सपोर्ट

यूएसमधील सर्व नेटवर्कला सपोर्ट

यूएसमधील काही नेटवर्कला सपोर्ट करत नाही. उदा. एटी  अ‍ॅण्ड टी, एलटीई

अ‍ॅण्ड्रॉईड अपडेट

उच्च क्षमतेचे मॉडेल 3 वेळा अपडेट होऊ शकतात.

अपडेट उपलब्ध नाही.

अमेरिकेत वापरण्या  योग्य

होय

अनलॉक करणं आवश्यक