Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Second Hand Scooter : सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करा फक्त 28,500 रुपयांत

Second Hand Scooter

Image Source : http://www.indiamart.com/

Second Hand Honda Activa : होंडा अ‍ॅक्टिव्हा ही गाडी भारतात लोकप्रिय आहे. भारतातील प्रत्येक घराच्या अंगणामध्ये ही गाडी उभी आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. तुम्हाला देखील ही गाडी खरेदी करायची असेल, तर एकदम स्वस्तात ही सेकंड हॅण्ड गाडी उपलब्ध आहे. ती कुठे व कितीला आहे, हे जाणून घेऊयात.

Second Hand Honda Activa: भारतात होंडा अ‍ॅक्टिव्हा ही गाडी खूप लोकप्रिय आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाडींमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हाचा समावेश करण्यात आला आहे. तुम्हालादेखील ही गाडी खरेदी करायची असेल, तर कमी बजेटमध्ये ही गाडी सेकंड हॅण्ड खरेदी करू शकता. चला, तर मग या गाडीविषयी अधिक जाणून घेऊयात

अ‍ॅक्टिव्हा कुठे व कितीला उपलब्ध

होंडा अ‍ॅक्टिव्हा ही सेकंड हॅण्ड गाडी विक्रीसाठी ड्रूम वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही Honda Activa 125cc स्कूटर आहे. याची किंमत 28,500 रूपये आहे. या गाडीने आतापर्यंत 32 हजार 400 किमीचा प्रवास केला आहे. या स्कूटरची रजिस्टर नोंदणी 2016 करण्यात आली होती.

अ‍ॅक्टिव्हाबाबत अधिक माहिती

होंडा स्कूटर फर्स्ट ओनर म्हणजेच मूळ मालकाकडून या गाडीची विक्री होत आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच दिल्लीत राहणारे लोक ही स्कूटर सहजपणे खरेदी करू शकतात. या स्कूटरसाठी वाहन मालकाने 28,500 रुपये मागितले आहेत. ड्रूम या पोर्टलवर, अ‍ॅक्टिव्हा स्कूटरची शेवटची सर्व्हिस कधी केली होती, इन्शुरन्स किती तारखेपर्यंतचा आहे याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सेकंद हॅण्ड गाडीला पसंती

होंडाची स्कूटर अ‍ॅक्टिव्हा ही जपानी वाहन निर्मित आहे. मात्र आता ही गाडी खरेदी करणेदेखील आवाक्याबाहेर केले आहे. पूर्वी ही गाडी बजेटमध्ये बसत होती. आता मात्र महागाईमुळे गाडयांच्या किंमतीतदेखील मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहक सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करण्यावर भर देत आहे. त्यामुळेऑनलाइन पोर्टलवर विविध ऑफरच्या शोधात ग्राहक असतात. अशा ग्राहकांसाठी ही गाडी खरेदी करणे एक सुवर्णसंधी आहे.