Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bryan Johnson: बापरे! तरुण दिसावं म्हणून हा उद्योगपती दरवर्षी फिटनेसवर खर्च करतो 2 दशलक्ष डॉलर!

Bryan Johnson:

Bryan Johnson: ब्रायन जॉन्सन हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित 45 वर्षीय उद्योजक आहेत. ते ब्लुप्रिंट, कार्नेल, ओएस फंड, ब्रेनट्री वेनमो या कंपन्यांचे मालक आहेत. फॉर्च्युन डॉट कॉमच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर इतकी आहे. ब्रायन हे सध्या 'Project Blueprint' वर काम करतायेत. त्यांचा असा दावा आहे ही त्यांनी याद्वारे त्यांचे जैविक वय (Biological Age) 5 वर्षांनी कमी केले आहे.

वाढत्या वयाचं अनेकांना टेंशन असतं. वार्धक्यात आपण कसे दिसू? काय आरोग्य समस्या येणार? असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडतात. काही लोक निसर्ग नियम म्हणून येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जातात तर काही लोक प्रमाणापेक्षा अधिक यावर विचार करत बसतात. कमी अधिक प्रमाणात असं चित्र तुम्हांला सगळीकडेच पाहायला मिळेल.

परंतु जगात असाही एक उद्योजक आहे जो वयाने कमी दिसावा आणि अधिकाधिक फिट दिसावा म्हणून वर्षाला करोडो रुपये खर्च करत आहेत. काय म्हणता, ऐकून आश्चर्य वाटलं ना? परंतु हो, हे अगदी खरं आहे.

ब्रायन जॉन्सन हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित 45 वर्षीय उद्योजक  आहेत. ते ब्लुप्रिंट, कार्नेल, ओएस फंड, ब्रेनट्री वेनमो या कंपन्यांचे मालक आहेत. फॉर्च्युन डॉट कॉमच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर इतकी आहे.  ब्रायन हे सध्या 'प्रोजेक्ट ब्लुप्रिंट' वर (Project Blueprint) काम करतायेत. त्यांचा असा दावा आहे ही त्यांनी याद्वारे त्यांचे जैविक वय (Biological Age) 5 वर्षांनी कमी केले आहे. ब्रायन हे त्यांच्या आरोग्याविषयी कमालीचे सजग आहेत. खाण्यापिण्यावर त्यांचे विशेष लक्ष असते.

काय आहे Project Blueprint?

प्रोजेक्ट ब्लुप्रिंटनुसार ब्रायन यांनी एक वेलनेस प्रोटोकॉल बनवला आहे.याद्वारे मानवी शरीरावरील 78 ठिकाणे सुचिबद्ध केली आहेत. ही 78 ठिकाणे बायोमार्क केली जात असून त्याद्वारे शरीरात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. शरीराला आवश्यक तो आहार, आराम आणि व्यायाम देण्यासाठी हे प्रोटोकॉल मदत करतात.

परंतु व्यक्तीने नियमबद्ध आहाराचे आणि दिनचर्येचे पालन करणे आवश्यक असल्याचे ब्रायन सांगतात. यासाठी ते दरवर्षी 2 दशलक्ष डॉलर इतका प्रचंड खर्च करतात. गेल्या 7 महिन्यात मी माझे जैविक वय 5 वर्षांनी कमी केले असून, असा करणारा मी एकमेव व्यक्ती असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

अँटी एजिंग प्रोटोकॉल (Anti Aging Protocol) विकसित करणार

माणसाचे वय कमी व्हावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर जॉन्सन सध्या भर देत आहेत. त्यांना येत्या काळात असे तंत्रज्ञान विकसित करायचे आहे जे लोकांना वृद्ध होण्यापासून वाचवेल. या प्रकल्पाला जशी काही लोकांनी पसंती दर्शवली तसाच काहींनी विरोध देखील केलाय. निसर्गाच्या विरुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करणे चुकीचे आहे असे टिककरांचे मत आहे.

खर्च होतो कुठे? 

अँटी एजिंग (वय कमी करण्यासाठी) प्रोटोकॉल तयार करण्यासाठी ब्रायन हे खाण्यापिण्यावर सर्वाधिक खर्च करतात. रोज एक तास ते व्यायाम करतात. 7-8 तास झोप घेतात. दिवसाला किती कॅलरी खायच्या हे देखील त्यांनी ठरवलेले आहे. त्यांच्या बॉडी मास इंडेक्स (Body Mass Index) नुसार ते दिवसाला 1977 कॅलरीज घेतात. त्यांचे जेवण, नाश्ता सगळे काही मोजमाप केलेले असते.

त्यांच्या दररोज अल्ट्रासाऊंड, एमआरआय, कोलोनोस्कोपी आणि रक्त चाचण्या होतात. जॉन्सन हे त्यांची झोप देखील मॉनिटर करतात. ही सगळी दिनचर्या करण्यात जॉन्सन यांचा वर्षाकाठी 2 दशलक्ष डॉलर इतका खर्च होतो आहे.

source: https://rb.gy/oo4zm