Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: आवड जोपासत केला स्वत:चा ब्रँड तयार, वर्षाला लाखोंचा नफा

Spices Business

Spices Business: कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथे राहणाऱ्या सरिता करंबळकर यांनी मसाले तयार करण्याची आवड आणि गुणवत्ता जोपासत 'साक्षीज रसोई मसाले' नावाचा ब्रँड उद्यास आणला. मसाले तयार करण्याचा त्यांचा हा साडेचार वर्षांचा प्रवास त्यांना प्रचंड अनुभव देऊन गेल्याचं सरिता सांगतात.

Sakshi's Rasoi Masale: कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथे राहणाऱ्या सरिता करंबळकर यांचे पती मारुती करंबळकर हे देखील व्यावसायिक आहेत. घरची परिस्थिती चांगली असल्याने सरिता यांना कधी व्यवसाय करण्याची गरज भासली नव्हती. परंतु, त्यांना शिवणकाम आणि विविध मसाले तयार करण्याची आवड होती. याच आवडीला जोपासत सरिता यांनी आपला व्यवसाय उभा करीत स्वत:चा एक ब्रँड तयार केला.

आवडीतून साकारला उद्योग

चार ते पाच वर्षांपूर्वी सरिता यांनी घरगुती स्वरुपात चिकन, मटण, बिर्याणी, गरम मसाला आदी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. शेजारी, नातेवाईक, काही किराणा दुकाने, मॉल, हॉटेल अशा ठिकाणी त्यांनी हे मसाले प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये पॅक करुन देण्यास सुरुवात केली. गुणवत्ता आणि स्वाद या बळावर विशेषत: हॉटेल व्यावसायिकांकडून मोठी मागणी येऊ लागली. त्यामुळे सरिता यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी विविध मसाल्यांचा उद्योग सुरु करण्याचा व्यवसाय सुरु केला.

'अशी' झाली व्यवसायाची सुरुवात

2020 मध्ये सरिता करंबळकर यांनी सोनपरी महिला बचत गटाची स्थापना केली. 1 वर्षानंतर पीएमएफएमई या योजनेचा लाभ घेतला. प्रोजेक्ट फाइल तयार करुन बँकेला दिली आणि 10 लाखाचे कर्ज घेतले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जातून उभे केलेले 15 लाख रुपये आणि काही पैसा स्वत: जवळचा टाकून सर्व यंत्र सामग्री तसेच मसाले तयार करण्यास लागणारा कच्चा माल विकत घेतला. अशाप्रकारे 'साक्षीज रसोई मसाले' नावाचा ब्रँड उद्यास आणला. आता या कंपनी मध्ये एकूण 5 ते 7 कर्मचारी काम करतात.

22 प्रकारचे मसाले आणि चटण्या

स्द्यस्थितीत सरिता यांच्या कंपनीत मसाले आणि चटणी मिळून 22 प्रकारचे प्रॉडक्ट तयार केले जातात. 7 ते 100 ग्रॅमची पॅकिंग असलेल्या या मसाल्यांची किंमत 5 रुपये ते 100 रुपये दरम्यान आहे. आख्खा मसूर मसाला, चिकन आणि मटण मसाला, बिर्याणी मसाला या मसाल्यांची सर्वाधिक विक्री होत असल्याची माहिती उद्योजिका सरिता करंबळकर यांनी दिली. या मसाले उद्योगाच्या माध्यमातून सरीता यांनी 3 ते 4 लाख रुपये वार्षिक नफा होतो.