Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: कसे कराल मेडिटेशन क्षेत्रात करिअरची सुरवात, वर्षाला होईल लाखोंचा नफा

Career In Meditation

Meditation: आजच्या धावपळीच्या युगात मनुष्य प्रचंड तणावात वावरत असतो. या तणावामुळे आणि अयोग्य अशा दिनचर्यामुळे आज अनेक आजार मनुष्याला होतांना दिसत आहे. अनेकदा मानसिक आजारामधूनच शारीरिक आजार निर्माण होत असतात. अनेकदा शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी मेडिटेशन हा रामबाण उपाय असतो. सध्या मेडिटेशन ही काळाची गरज असल्याने तुम्ही यामध्ये उत्तम करिअर निवडू शकता.

Career In Meditation: विज्ञानाने जसजशी प्रगती साधली आहे, तसतशी मनुष्याची जीवन जगण्याची पद्धत बदलत गेली आणि या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होऊ लागला. आज मनुष्याला मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे मनुष्याला आता औषधांसह मेडिटेशनची देखील नितांत गरज भासू लागली आहे. मेडिटेशन केल्याने आपल्या आतील संतुलन संतुलित राखले जाते आणि आपले चित्त एकाग्र तसेच शांत स्थितीत येण्यास मदत होते.

वेदनांवर नियंत्रण

जर तुम्ही नियमितपणे मेडिटेशन केले तर मेंदूची वेदना ग्रहण करणारी केंद्रे बदलू शकतात. त्यामुळे वेदनांची संवेदनशीलता कमी होते. त्याच वेळी तुम्हाला ती ताकद आणि क्षमता मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही वेदनांवर नियंत्रण ठेवू शकतात.

औषधांवरील खर्च कमी होतो

मेडिटेशन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. सोबतच तुमच्या औषधांची मात्रा कमी होते. त्यामुळे सातत्याने औषधांवर आणि इतर ट्रिटमेंटवर होणारा खर्च कमी होतो. मेडिटेशनमुळे तुमचे शरीरातील हार्मोन्स नियंत्रित राहण्यास मदत होते. आपली मानसिक स्थिती ही अनेक वेदनांचे आणि अनेक समस्यांचे कारण असते. मेडिटेशनमुळे या वेदना कमी होण्यास आणि मन एकाग्र होण्यास मदत होते.

ओंकार मेडिटेशनचा लाभ

आज नागपूर शहरात अनेक ठिकाणी मेडिटेशन सेंटर आहेत. त्यापैकी एक म्हणजे डॉ. रीचा जैन यांचे मेडिटेशन सेंटर आहे.  डॉ. रीचा जैन यांच्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंट कडून दररोज 3 तासांचे ओंकार मेडिटेशन करवून घेतल्या जाते. यामुळे पेशंटच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते आणि पेशंटच्या सकारात्मक वृत्तीमुळे पेशंटची तब्येत दिर्घकाळ उत्तम राहण्यास मदत होते, अशी माहिती  डॉ. रीचा जैन यांनी दिली.

करिअरसाठी उत्तम पर्याय

दिवसेंदिवस मेडिटेशन फार लोकप्रिय होत चाललयं. शिवाय ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही जर एखाद्या चांगल्या संस्थेमधून मेडिटेशनचा कोर्स केला तर तुम्ही देखील स्वत:चे मेडिटेशनचे क्लासेस सुरु करु शकता. यामाध्यमातून तुम्हाला महिन्याला किमान 20 हजार ते 50 हजार  रुपयांपर्यंत नफा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही तुमच्या पेशंटला कसं खिळवून ठेवता, त्यांचे काउंसलिंग कसे करता? यावर तुमच्या व्यवसायाचे गणित अवलंबून असते.